Homeताज्या बातम्या

गेवराईत वेश्या व्यवसायावर पोलिसांचा धडक छापा; तीन पीडित महिलांची सुटका, दोन महिलांविरुद्ध गुन्हागुप्त माहितीच्या आधारे एएचटीयू ची कारवाई; डमी ग्राहकाच्या मदतीने उघड झाला प्रकार

गेवराई शहरातील अचानक नगर परिसरात सुरू असलेल्या कथित वेश्या व्यवसायावर बीडच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने (एएचटीयू) नियोजनबद्ध कारवाई कर

जनगणनेसाठी आता घरोघरी प्रगणक येणार16 मे ते 14 जून दरम्यान घरभेटीद्वारे माहिती संकलनअचूक माहिती द्या, प्रशासनाला सहकार्य करा : जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन
हॅरीसन फ्रान्सिस रेड्डी यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
एसटी महामंडळाचा भोंगळ कारभारलिंबागणेश येथे एसटी बस बंद पडल्याने प्रवाशांचे हाल, वाहतूक विभाग मात्र बेफिकीर-डॉ. गणेश ढवळे



गेवराई शहरातील अचानक नगर परिसरात सुरू असलेल्या कथित वेश्या व्यवसायावर बीडच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने (एएचटीयू) नियोजनबद्ध कारवाई करत तीन पीडित महिलांची सुटका केली आहे. या प्रकरणी दोन महिला आरोपींविरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी व्यापार (प्रतिबंध) अधिनियम, 1956 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, या रॅकेटशी संबंधित आणखी काही व्यक्तींचा सहभाग आहे का, याचाही पोलीस तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक जनाबाई सांगळे यांना 8 जुलै रोजी अचानक नगरातील एका घरात बाहेरून महिलांना आणून देहव्यापार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. माहितीची सत्यता पडताळण्यासाठी वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला. यासाठी एका व्यक्तीला ’डमी ग्राहक’ म्हणून पाठविण्यात आले. संबंधित महिला एजंटशी संपर्क साधल्यानंतर तिने वेश्यागमनासाठी एक हजार रुपयांची मागणी केली. ठरल्याप्रमाणे डमी ग्राहकाने पैसे दिल्यानंतर पूर्वनियोजित संकेत दिला आणि त्याच क्षणी पोलीस निरीक्षक निलेश केळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने संबंधित घरावर धाड टाकली. कारवाईदरम्यान घरातून तीन महिलांची सुटका करण्यात आली. चौकशीदरम्यान मुख्य आरोपी नागरबाई लक्ष्मण हातागळे (रा. रामतीर्थ, बीड) हिने संबंधित ठिकाणी वेश्या व्यवसाय चालत असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच, सुटका करण्यात आलेल्या महिलांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात आरोपी नागरबाई हातागळे आणि घरमालकीण शांताबाई सतीश पवार या जबरदस्तीने त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत होत्या. त्यांच्या कमाईतील मोठा हिस्सा आरोपी स्वतः घेत असल्याचाही आरोप पीडित महिलांनी केला आहे. छाप्यामध्ये पोलिसांनी डमी ग्राहकाला देण्यात आलेल्या 500 रुपयांच्या दोन नोटा, 21 निरोध तसेच इतर काही साहित्य जप्त केले. घटनास्थळाचा पंचनामा करून सर्व पुरावे ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी नागरबाई लक्ष्मण हातागळे आणि शांताबाई सतीश पवार यांच्याविरुद्ध अनैतिक मानवी व्यापार (प्रतिबंध) अधिनियम, 1956 मधील विविध कलमांनुसार गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुटका करण्यात आलेल्या महिलांना आवश्यक वैद्यकीय तपासणी व समुपदेशनासाठी संबंधित यंत्रणेकडे पाठविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलेश केळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जनाबाई सांगळे तसेच बीडच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास गेवराई पोलीस ठाणे करीत असून, या रॅकेटशी संबंधित इतर व्यक्तींचाही शोध सुरू आहे.

COMMENTS