आदिशक्ति संत मुक्ताई यांचे आजोबा ब्र. गोविंदपंत ज्या मार्गावर समाधिस्त आहेत, ज्या मार्गावर संत मुक्ताईची पालखी बीड शहरात दोन दिवस मुक्कामी राहत ब

आदिशक्ति संत मुक्ताई यांचे आजोबा ब्र. गोविंदपंत ज्या मार्गावर समाधिस्त आहेत, ज्या मार्गावर संत मुक्ताईची पालखी बीड शहरात दोन दिवस मुक्कामी राहत बीडकरांना दर्शन देते त्या मार्गाला ‘संत मुक्ताई मार्ग’ असे नाव देण्याचा निर्णय बीड नगर परिषेदेने घेतला असून यास विविध सामाजिक संघटना व सर्वपक्षीय सहमती दिली आहे. बीड शहरात संत मुक्ताई यांच्या पालखीच्या आगमन दिवशी नामफलकाचे अनावरण संत महंत व मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याचे बीड नगर पालिकेने कळविण्यात आले आहे. ‘संत मुक्ताई मार्ग’ नामकरण सोहळा आ. विजयसिंह पंडित यांच्या अध्ययक्षतेखाली दिनांक 11 जुलै रोजी 11 वाजता पार पडणार असून यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पालिका पदाधिकार्यांनी केले आहे.
बीड शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या दरम्यान मार्गास आदिशक्ती संत मुक्ताई महाराज यांच्या नावाच्या नामफलकाचे अनावरण होणार आहे. हा नामफलकाचा अनावरण सोहळा ह.भ.प. प्रेममूर्ती शिवाजी महाराज महंत, श्री क्षेत्र नारायणगड, संत मुक्ताई पालखी सोहळ्याचे अध्यक्ष रविंद्र महाराज पाटील, लक्ष्मण महाराज मेंगडे, गोरक्षनाथ टेकडीचे नवनाथ महाराज, चाकरवाडीचे महादेव महाराज, रामगडाचे स्वामी योगीराज महाराज, भवानीगडचे अखंडानंद गिरी महाराज, नवगण राजुरीचे अमृत महाराज जोशी, बेलेश्वर संस्थानचे भारती महाराज, महादेव महाराज राऊत जवळेकर, विनायक महाराज पाटांगणकर, अतुल महाराज शास्त्री, लक्ष्मण महाराज फड, हरिदासभाऊ जोगदंड यांच्या शुभहस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आ. विजयसिंह पंडित राहणार आहेत. शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल जगताप, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, संपादक शेख मुजीब, मा.अध्यक्ष मराठवाडा चेम्बर्स अँड कॉमर्सचे सत्यनारायण लाहोटी, शिवसेना जिल्हा प्रमुख स्वप्नील गलधर, जिल्हा प्रमुख शिवसेना सचिन मुळूक, व्यापारी महासंघ कॅटचे संतोष सोहनी यांच्यासह आदी मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन नगराध्यक्षा श्रीमती प्रेमलता पारवे, उपनगराध्यक्ष विनोद मुळूक, सभापती शेख निजाम, गटनेते फारूक पटेल, स्थायी समिती सदस्य अमर नाईकवाडे, सभापती संजय उडाण, सभापती श्रीमती मोमीन सीमा परवीन, सभापती गुंजाळ धर्मराज लक्ष्मण, सभापती श्रीमती आरती रंजित बनसोडे, बीड शहर व्यापारी महासंघ कॅटचे अध्यक्ष विनोद पिंगळे, सुभाष रोड व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष निलेश ललवाणी यांच्यासह संत मुक्ताई मार्ग व्यापारी असोसिएशन, संत मुक्ताई नामकरण समिती, वारकरी सांप्रदाय, बीड यांनी केले आहे.
आळंदी देवस्थानाकडून अभिनंदन
संत ज्ञानेश्वर यांची समाधी असलेल्या देवाची आळंदी कडून घेतलेल्या ठराव बद्दल बीड नगर पालिकेचे अभिनंदन लेखी स्वरूपात केले आहे . आ विजयसिंह पंडित व नगराध्यक्षा प्रेमलताताई पारवे यांचा उल्लेख करून संस्थान कडून बीड करांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
नारायण गडाने दिला कौल
आध्यत्मिक संदर्भ आणि वर्तमान लोकभावनां लक्षात घेऊन नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज यांनी व उत्तर अधिकारी संभाजी महाराज यांनी स्वाक्षरी सह अभिप्राय देताना संत मुक्ताईचे नाव मार्गास देणे संयुक्तिक असल्याचे लेखी म्हटले आहे .
व्यापारी बांधवाकडून स्वागत
सुभाष रोड असोशियसन यांनी लेखी पत्र देऊन संत मुक्ताईचे नाव देण्यास हरकत नसल्याचे कळवत ठरावाचे स्वागत केले .संतोष सोहनी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या व्यापारी महासंघाने मागणीचे स्वागत केले .

COMMENTS