विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या गेल्या दोन दशकांपासून प्रलंबित असलेल्या ’ शंभर टक्के अनुदान’ प्रश्नाला अखेर उद्या न्याय मि

विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या गेल्या दोन दशकांपासून प्रलंबित असलेल्या ’ शंभर टक्के अनुदान’ प्रश्नाला अखेर उद्या न्याय मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या संदर्भात आज शुक्रवार ( दि. 10 जुलै) रोजी सकाळी 11:10 वाजता राज्याचे मुख्यमंत्री यांच्यासोबत एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अंतिम बैठक होणार आहे. या बैठकीत शिक्षकांच्या हक्काच्या टप्पा वाढीबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आमदार विक्रम काळे यांनी दिली आहे. दुसरीकडे या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आणि सरकारवर दबाव गट निर्माण करण्यासाठी राज्याच्या कानाकोपर्यातून शिक्षकांनी मुंबईच्या आझाद मैदानावर येण्यास सुरुवात केली आहे.
’एक दिवसाचा त्याग आयुष्यभराचा सन्मान!’ – खंडेराव जगदाळे
उद्याचा दिवस आपल्या वीस वर्षांच्या प्रदीर्घ आणि खडतर संघर्षाला न्याय मिळवून देणारा आजचा दिवस ऐतिहासिक दिवस ठरू शकतो. या लढ्यातील अंतिम विजय डोळ्यांनी पाहण्यासाठी आणि या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी प्रत्येक शिक्षकाने कोणत्याही परिस्थितीत आझाद मैदानावर पोहोचले पाहिजे, असे आवाहन शिक्षक समन्वय समितीचे नेते खंडेराव जगदाळे यांनी केले. यावेळी पुढे बोलताना खंडेराव जगदाळे यांनी मिळेल त्या गाडीने मुंबईचे क्रांतिकारी आझाद मैदानात उपस्थित रहा अशी भावनिक साद जगदाळे यांनी घातली.
शिक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता!
आझाद मैदानावर नव्हे तर संपूर् महाराष्टातील शिक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आणि अस्वस्थता निर्माण झाली असून, आझाद मैदानावर गर्दी जमवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या निमित्ताने शिक्षक समन्वय संघाच्या वतीने शिक्षकांना तिकीट असो वा नसो: जनरल असो वा रिझर्वेशन, जी गाडी मिळेल त्या गाडीने तात्काळ मुंबईची वाट धरा. रात्रीची ट्रेन न मिळाल्यास, सकाळची ’वंदे भारत एक्सप्रेस’ किंवा उपलब्ध असलेल्या इतर कोणत्याही वाहनाने मुंबई गाठा अशी भावनिक साद घालण्यात आली आहे.
सरकार सकारात्मक, पण एकजूट दाखवण्याची वेळ!
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री आणि सर्वपक्षीय आमदारांकडून यापूर्वीच शिक्षकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक आश्वासन मिळाले आहे. मात्र, ऐन ऐनवेळी निर्णयावर शिक्कामोर्तब व्हावे यासाठी शिक्षकांची भक्कम उपस्थितीच या लढ्याची सर्वात मोठी ताकद ठरणार आहे. गेल्या 20 वर्षांपासून अत्यंत तुटपुंज्या पगारावर काम करणार्या हजारो शिक्षकांचे भवितव्य आजच्या बैठकीवर अवलंबून आहे. त्यामुळे उद्याचा ’एक दिवसाचा त्याग, आयुष्यभराचा सन्मान’ ठरवणार का? याकडे आता संपूर्ण राज्यभरातील शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे

COMMENTS