https://youtu.be/IDlYHldIaP0 श्रीक्षेत्र पैठणचे शांती ब्रह्म एकनाथ महाराजांची पालखी सोहळा हा पंढरीच्या दिशेने विठुरायाचा व ज्ञानोबा तुकारामाचा ग
श्रीक्षेत्र पैठणचे शांती ब्रह्म एकनाथ महाराजांची पालखी सोहळा हा पंढरीच्या दिशेने विठुरायाचा व ज्ञानोबा तुकारामाचा गजर करीत निघालेला असून अहिल्यानगर जिल्ह्यात पालखीने प्रवेश केल्यावर मुंगी येथे पालखीचे प्रांत अधिकारी प्रसाद मते , तहसीलदार आकाश दहाडदे , गटविकास अधिकारी सोनल शहा यांनी भव्य असे स्वागत केले , अहिल्यानगर जिल्ह्याच्या मुंगी हातगाव , बोधेगाव , बालमटाकळी , बाडगव्हाण , लाड जळगाव येथे पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले . धोंगडे परिवारांकडून पायघड्या टाकून ढोल ताशांच्या व टाळ मृदंगाच्या गजरात सबंध गावातून पालखी मिरवून भाविकांनी नाथांच्या पादुकांचे मोठ्या भक्ती भावाने दर्शन घेऊन नाथ पालखीचे चालक रघुनाथ महाराजांचे स्वागत केले ,
आकाशाला गवसणी घालणाऱ्या उंच उंच पताका , वारकऱ्यांच्या हातातील भगवे झेंडे, टाळ मृदुंगाचा निनाद आणि ज्ञानोबा तुकाराम व भानुदास एकनाथ महाराजांचा गजर करीत वैष्णवांचा मेळा हा आषाढी एकादशी निमित्त पंढरीच्या विठुरायाला भेटण्यासाठी दरकोस दर मुक्काम करीत पंढरपूरला दिशेने निघालेला आहे ,
बालमटाकळी येथे पालखीसाठी पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बाजीराव सानप पोलीस उपनिरीक्षक सतीश गोरे यांचे सह पोलीस कर्मचारी होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता .

COMMENTS