Homeताज्या बातम्या

प्रा.विजया करडखेडकर यांचे निधन

नांदेड येथील वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालयाच्या माजी उपप्राचार्या  प्रा. सौ. विजया लक्ष्मणराव करडखेडकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्य

योगेश फुलशंकर यांचे प्रदीर्घ आजाराने निधनअर्जुन फुलशंकर यांना पुत्रशोक
कैलास मैड यांना मातृशोक
नांदेड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीराम पाटील राजूरकर यांचे निधन


नांदेड येथील वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालयाच्या माजी उपप्राचार्या  प्रा. सौ. विजया लक्ष्मणराव करडखेडकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने शैक्षणिक, सामाजिक व साहित्य क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
प्रा. करडखेडकर यांनी अनेक वर्षे वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालयात अध्यापन करताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मोलाचे योगदान दिले. शिस्तप्रिय, अभ्यासू आणि विद्यार्थ्यांप्रती आत्मीयता जपणार्‍या शिक्षिका म्हणून त्यांची ओळख होती. उपप्राचार्या म्हणून कार्यरत असताना त्यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीतही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या पश्चात पती लक्ष्मणराव करडखेडकर, तीन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्ययात्रेस शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. सौ. विजया करडखेडकर या प्रसिद्ध लेखक विश्वास वसेकर यांच्या सासूबाई होत, तर ज्येष्ठ साहित्यिक व वक्ते डॉ. दीपक कासराळीकर यांच्या त्या ज्येष्ठ भगिनी होत. त्यांच्या निधनाबद्दल विविध स्तरांतून शोक व्यक्त करण्यात येत असून, त्यांच्या कार्याची आठवण कृतज्ञतेने व्यक्त केली जात आहे.

COMMENTS