Homeताज्या बातम्या

नांदेड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीराम पाटील राजूरकर यांचे निधन

नांदेड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीराम पाटील राजूरकर (वय 87) यांचे बुधवारी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने सामाजिक व राजकीय

प्रा.विजया करडखेडकर यांचे निधन
महाराष्ट्रातील दोन जवानांना वीरमरणजम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये ग्रेनेडचा स्फोट
गजानन कारखान्याचे माजी संचालक चंद्रभान माने यांचे निधन



नांदेड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीराम पाटील राजूरकर (वय 87) यांचे बुधवारी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने सामाजिक व राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
श्रीराम पाटील राजूरकर यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून कार्य करताना ग्रामीण विकास, लोकाभिमुख प्रशासन आणि जनहिताच्या विविध प्रश्नांसाठी उल्लेखनीय योगदान दिले होते. त्यांच्या कार्याचा ठसा नांदेड जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रावर उमटला आहे. त्यांच्या पार्थिवावर गुरुवार, दि. 2 जुलै रोजी दुपारी 1 वाजता मुखेड तालुक्यातील राजुरा (बुद्रुक) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

COMMENTS