Homeताज्या बातम्या

एक हात मदतीचा – गरजूंना मदतीचा आधार

चौसाळा : कला व विज्ञान महाविद्यालय, चौसाळा येथे एक हात मदतीचा या सामाजिक उपक्रमांतर्गत निवारा बालगृह, मोहा (ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) येथील गरज

घरकुल लाभार्थ्यांचे हप्ते तातडीने द्या; खा.बजरंग सोनवणेंचे मुख्यमंत्र्यांना पत्रबीड जिल्ह्यात 54 हजार घरकुलांचे हप्ते रखडले
अल्पसंख्याक संरक्षण कायद्यासाठी लोकसेना राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामासमाजाला संरक्षण मिळेपर्यंत लोकशाही मार्गाने लढा सुरू ठेवणार-अ‍ॅड.प्रा. इलियास इनामदार
बालसंगोपन योजनेचे अनुदान रखडल्याने ‘लाडके भाचे’ आर्थिक संकटातदीड ते दोन वर्षांपासून लाभार्थी प्रतीक्षेत; शिक्षण, पोषण आणि दैनंदिन गरजांवर परिणाम


चौसाळा : कला व विज्ञान महाविद्यालय, चौसाळा येथे एक हात मदतीचा या सामाजिक उपक्रमांतर्गत निवारा बालगृह, मोहा (ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) येथील गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल निराधार बालकांसाठी अन्नधान्य, कपडे, जीवनावश्यक वस्तू तसेच रोख रक्कम यांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित खाकरे यांच्या हस्ते सर्व जीवनावश्यक वस्तू व रोख रक्कम निवारा बालगृहातून आलेले स्वयंसेवक श्री. दादा शेखर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी महाविद्यालयातील सर्व कर्मचार्‍यांनी स्वयंस्फूर्तीने रोख रक्कम जमा करून सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले. कार्यक्रमास उपप्राचार्य ढवळशंक सर, पदवीधर विभाग प्रमुख वनवे सर तसेच समिती प्रमुख डॉ. शाहीन सय्यद, प्रा. मनीषा गिराम, डॉ. पंढरीनाथ हिरवे, संजय घाडगे, प्रा. सीमा पवार आदी उपस्थित होते. या उपक्रमातून समाजात माणुसकी, सहकार्य आणि सेवाभावाची भावना अधिक दृढ करण्याचा संकल्प करण्यात आला.

COMMENTS