Homeताज्या बातम्या

एस.के.एच. वैद्यकीय महाविद्यालयात ’हॅनेमन मेमोरियल प्लेज’ सोहळा संपन्न

बीड येथील सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयात ’हॅनेमन मेमोरियल प्लेज’ (सामूहिक शपथ ग्रहण) सोहळा अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध व

राज्यात आरोग्य सेवांचे जाळे अधिक मजबूत करणारमुख्यमंत्री फडणवीस : नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांत ‘उडान’ प्रकल्पाला पाच वर्षांची मुदतवाढ
निरोगी आयुष्यासाठी योग हा महत्वाचा : मुख्यमंत्री फडणवीस
राजस्थानमध्ये आढळला इबोलाचा संशयित रूग्ण


बीड येथील सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयात ’हॅनेमन मेमोरियल प्लेज’ (सामूहिक शपथ ग्रहण) सोहळा अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.
होमिओपॅथीचे जनक डॉ.सॅम्युअल हॅनेमन यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा संपूर्ण कार्यक्रम महाविद्यालयाचे मार्गदर्शक व सल्लागार डॉ. अरुण भस्मे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेंद्र गौशाल आणि उपप्राचार्य डॉ.गणेश पांगारकर उपस्थित होते. त्यांच्यासह डॉ. शेख अतिक, डॉ.शेख जफर, डॉ.सुहास जोशी, डॉ.अनिल राठोड, डॉ.अनिस आणि डॉ.अश्विनी ढवळे यांच्यासह प्राध्यापक व डॉक्टरांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमा दरम्यान उपस्थित सर्व प्राध्यापक, फिजीशियन्स, इंटर्न्स तसेच पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी होमिओपॅथी वैद्यकीय व्यवसायाच्या नैतिक मूल्यांचे पालन करण्याची आणि रुग्णसेवेचा संकल्प करणारी सामूहिक शपथ घेतली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय पुनेकर याने केले. राष्ट्रीय आयोगाच्या सूचनेनुसार, कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर या सोहळ्याचा संक्षिप्त अहवाल आणि छायाचित्रे दिल्ली येथील मुख्य आयोगाकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती महाविद्यालय प्रशासनातर्फे देण्यात आली. या उपक्रमाबद्दल बीडच्या वैद्यकीय क्षेत्रातून कौतुक होत आहे.

COMMENTS