Homeताज्या बातम्या

शेवगावात अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईस्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी ; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

शेवगाव : अवैध वाळू वाहतूकी विरोधात स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी (दि ०२)  पुन्हा एकदा धडक कारवाई करत शेवगाव शहरातील लांडे वस्ती परिसरातून विना परवाना शासकीय वाळूची वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला. या कारवाईत ट्रॅक्टर, ट्रॉली आणि एक ब्रास शासकीय वाळू सह ५ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी चालकाविरुद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकूळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.काॅ.बाळासाहेब ज्ञानदेव नागरगोजे यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार लांडे वस्ती परिसरात सापळा रचण्यात आला. दुपारी संशयित ट्रॅक्टर अडवून तपासणी केली असता चालकाने नाव कृष्णा दगडू धनवडे (वय ३०, रा. शेवगाव) असे सांगितले. त्याच्याकडे वाळू वाहतुकीसाठी कोणताही वैध परवाना नसल्याचे आढळून आले.पोलिसांनी विनानंबर स्वराज ७४४ कंपनीचा ट्रॅक्टर, ट्रॉली व एक ब्रास शासकीय वाळू असा एकूण ५ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी कृष्णा धनवडे याच्याविरुद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. कारवाईत पो. काॅ. बाळासाहेब नागरगोजे, पो. काॅ. किशोर शिरसाट, पो. काॅ. बाळासाहेब खेडेकर, पो. काॅ. अमोल कोतकर, पो. काॅ. भाऊसाहेब काळे आदींचा सहभाग होता. या कारवाईनंतर पुन्हा एकदा अवैध वाळू वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी याविरोधात खास मोहीम राबवावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

यशवंत विद्या पतसंस्थेच्या अध्यक्षपदी प्रा. पवार तर शेळके उपाध्यक्ष
मच्छिंद्र चाकणे यांचा सत्कार
वीजप्रश्न आंदोलनातील मोर्चेकरी १६ वर्षानंतर निर्दोष  

COMMENTS