Homeताज्या बातम्या

समता स्कूलमध्ये विद्यार्थी नेतृत्वाचा शपथविधी सोहळा  

कोपरगाव शहर : विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्ये, नेतृत्वगुण, स्वयंशिस्त, सेवाभाव आणि सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव रुजविणाऱ्या विद्यार्थी प्रतिनिधी पदग्रहण व शपथविधी सोहळा समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये पार पडला.समता परिवाराचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी रुजविलेल्या मूल्याधिष्ठित शिक्षण परंपरेचा वारसा जपत शाळेत सलग चौदाव्या वर्षी पारदर्शक पद्धतीने विद्यार्थी निवडणुका घेण्यात आल्या.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश नामदेवराव परजणे, समता चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष तथा शाळेचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, सुहासिनी कोयटे, शाळेचे कार्यकारी अधिकारी संदीप कोयटे, व्यवस्थापकीय विश्वस्त स्वाती संदीप कोयटे, प्राचार्य समीर अत्तार, उपप्राचार्य मोहिनी जगताप, पालक, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.व्यवस्थापकीय विश्वस्त स्वाती संदीप कोयटे यांनी नेतृत्व म्हणजे अधिकार नव्हे, तर जबाबदारी, विश्वास आणि समाजसेवेची भावना असल्याचे प्रतिपादन करत प्रामाणिक प्रयत्न, मूल्यनिष्ठा आणि कर्तव्यभावना हीच यशाची खरी गुरुकिल्ली असल्याचे सांगितले.केशमा खुराणा आणि इप्सिता राय यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर रैना जैन हिने आभार मानले. क्रीडा विभागाच्या उत्कृष्ट नियोजनासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समन्वित प्रयत्नांमुळे हा प्रेरणादायी सोहळा यशस्वीरीत्या पार पडला. शेवटी विद्यार्थी प्रतिनिधींनी कर्तव्य, शिस्त, सेवा आणि नेतृत्वाच्या मूल्यांचे जतन करत शाळेची उज्ज्वल परंपरा अधिक समृद्ध करण्याचा निर्धार व्यक्त केला.

वैद्यकीय क्षेत्र बळकट करण्यासाठी नवे पाऊल : मुख्यमंत्री फडणवीस; वैद्यकीय सेवेसाठी जायकाकडून 3 हजार 708 कोटींची वित्तीय सहाय्यता
पुणे विद्यापीठाच्या अधिष्ठातापदी डॉ. मंडलिक
मौत कल आती है, आज आ जाए.. डरता कौन है! प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेशानंतर आ. रोहित पवारांची भावनिक प्रतिक्रिया

COMMENTS