Homeताज्या बातम्या

निवृत्तीनाथ पालखी आगमन प्रसंगीबेलापूरमध्ये मांसाहारी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय

बेलापूर :बेलापूर गावासाठी सन्मानच्या निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर मास, मटण, मासे. अंडी विक्री बंद ठेवण्याचा निर्णय संबधीत व्यवसायिकांच्या बैठकीत घेण्यात आला. त्रंबकेश्वर येथून पंढरपूरला मार्गस्थ होणारी संतश्रेष्ठ निवृतीनाथ महाराजांच्या पालखीचे बेलापूर येथे आगमन होऊन मुक्काम पडतो.या पार्श्वभूमीवर बेलापूर बु.ग्रामपंचायत कार्यालयात जिल्हा परिषद सदस्य शरद नवले,बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे, ग्रामपंचायत अधिकारी निलेश लहारे यांच्या उपस्थितीत चिकन, मटण, मासे, अंडे विक्रेते दुकानदारांची बैठक घेण्यात आली. सदर बैठकीत संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर  बुधवार (दि.८ जुलै) रोजी बेलापूर बु येथील चिकन,मटण,मासे, अंडे विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.या निर्णयाचे ग्रामस्थ तसेच भाविकांनी स्वागत केले आहे.

ड्रोन व चोरट्यांबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये; पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांचे आवाहन
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी भाजप बळकट करावा: बेलापूर येथे विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सत्कार
पोलिओ लसीकरणास बेलापूरमध्ये मोठा प्रतिसाद 

बेलापूर :बेलापूर गावासाठी सन्मानच्या निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर मास, मटण, मासे. अंडी विक्री बंद ठेवण्याचा निर्णय संबधीत व्यवसायिकांच्या बैठकीत घेण्यात आला.

त्रंबकेश्वर येथून पंढरपूरला मार्गस्थ होणारी संतश्रेष्ठ निवृतीनाथ महाराजांच्या पालखीचे बेलापूर येथे आगमन होऊन मुक्काम पडतो.या पार्श्वभूमीवर बेलापूर बु.ग्रामपंचायत कार्यालयात जिल्हा परिषद सदस्य शरद नवले,बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे, ग्रामपंचायत अधिकारी निलेश लहारे यांच्या उपस्थितीत चिकन, मटण, मासे, अंडे विक्रेते दुकानदारांची बैठक घेण्यात आली. सदर बैठकीत संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर  बुधवार (दि.८ जुलै) रोजी बेलापूर बु येथील चिकन,मटण,मासे, अंडे विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.या निर्णयाचे ग्रामस्थ तसेच भाविकांनी स्वागत केले आहे.

COMMENTS