आर्यन खानची आज होणार सुटका

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आर्यन खानची आज होणार सुटका

मुंबई -क्रुझ ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेला शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याला गुरूवारी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजुर केला. आर्यनसह अरबाज मर्चंट आण

हिम्मत असेल तर बुलढाण्यातून माझ्या विरोधात लोकसभा निवडून दाखवा
वंचितच्या समावेशाबद्दल 15 दिवसात निर्णय घ्या
चॉकलेटने घेतला बाळाचा जीव 

मुंबई -क्रुझ ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेला शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याला गुरूवारी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजुर केला. आर्यनसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांना जामीन दिला. सर्वांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने जामिनावर अंतिम निर्णय दिला. आर्यनला जामीन मंजूर झाला असला तरी गुरूवारची रात्र तुरुगांतच काढावी लागणार आहे. शुक्रवारी उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत मिळणार असल्यामुळे उद्याच त्याची तुरुंगातून सुटका होणार आहे.
आर्यन खानची बाजू मांडण्यासाठी भारताचे माजी अ‍ॅटर्नी जनरल आणि ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांच्यासह ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे न्यायालयात हजर होते. तिन्ही आरोपींच्या वकिलांनी जामिनासाठी न्यायालयासमोर युक्तिवाद केला. एनसीबीच्यावतीने अतिरिक्त सॉलिसीटर जनरल अनिल सिंग यांनी बाजू मांडली. अनिल सिंग म्हणाले, आर्यन खान ड्रग्जचे नियमित सेवन करत होता. हे सिद्ध करण्यासाठी आमच्याकडे पुरेसे पुरावे आहेत. आर्यनने जाणीवपूर्वक ड्रग्ज बाळगले होते. दोन व्यक्ती सोबत आहेत, त्यातील दुसर्‍याला ड्रग्ज असल्याचे माहिती आहे. त्याने ड्रग्ज घेतले तर पहिला व्यक्तीने जाणीवपूर्वक ड्रग्ज बाळगले असा अर्थ निघतो. आर्यन आणि अरबाज बालपणापासूनचे मित्र आहेत. ते सोबत फिरले आणि एकाच रूममध्ये राहिले. आरोपींचे वकील ड्रग्ज सेवन केले होते की नाही हे स्पष्ट होण्यासाठी वैद्यकीय चाचणी का केली नाही असा युक्तीवाद करत आहेत. मात्र, आमचा आरोप सेवनाचा नाही, तर ड्रग्ज बाळगल्याचा आहे. आर्यन खानने सेवनाच्या उद्देशाने ड्रग्ज बाळगले. हे प्रकरण सेवन करण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक ड्रग्ज बाळगण्याचे आहे. आरोपींकडे व्यावसायिक स्तरावरील ड्रग्जची मात्रा सापडली. सर्व 8 आरोपींकडे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्ज सापडले. याची एकूण मात्रा पाहिली असता यात व्यापक विक्रीचा कट दिसतो, असे अनिल सिंग म्हणाले. या संपूर्ण युक्तीवादानंतर न्यायालयाने आर्यन खानचा जामीन मंजुर केला.

समीर वानखेडेंना उच्च न्यायालयाचा दिलासा
एनसीबीचे मुंबईचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याविरोधात मुंबईत काही ठिकाणी तक्रारी दाखल झाल्यामुळे मुंबई पोलिसांकडून त्यांची चौकशी करण्यासाठी एक विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकाकडून करण्यात येणार्‍या कठोर कारवाईविरोधात दिलासा मिळवण्यासाठी याचिका समीर वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. ती याचिका निकाली काढत उच्च न्यायालयाने समीर वानखेडे यांना दिलासा देत मुंबई पोलिसांना अटकेची कारवाई करण्यापूर्वी 3 दिवसांची नोटीस समीर वानखेडे यांना देण्यास सांगितले आहे. मुंबई पोलीस अटक करतील अशी या भीतीने समीर वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उच्च न्यायालयाने त्यांना तूर्तास दिलासा दिला आहे.

किरण गोसावीला 8 दिवसांची पोलिस कोठडी
क्रूझवरील संपूर्ण कारवाईदरम्यान साक्षीदार किरण गोसावीला पुणे पोलिसांनी फसवणुकीच्या एका गुन्ह्याखाली अटक केली आहे. किरण गोसावीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 8 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. न्यायाधीश आर.के.बाफना भळगट यांच्या कोर्टात ही सुनावणी झाली. किरण गोसावीची पोलिस कोठडी मागताना सरकारी वकील वर्षा असलेकर यांनी युक्तिवाद केला. तर गोसावीच्या बाजूने सचिन कुंभार यांनी युक्तीवाद केला. दोन्ही वकीलांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने गोसावीला 8 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

COMMENTS