शेवगाव : रोटरी क्लब ऑफ शेवगाव सिटीच्या २०२६ - २७ वर्षासाठी साठी नूतन अध्यक्षपदी प्रसिद्ध दंतशल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम बिहाणी व सचिव पदी प्रा.

शेवगाव : रोटरी क्लब ऑफ शेवगाव सिटीच्या २०२६ – २७ वर्षासाठी साठी नूतन अध्यक्षपदी प्रसिद्ध दंतशल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम बिहाणी व सचिव पदी प्रा. गजानन लोंढे यांची निवड झाली. रो. अशोक लबडे यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली. रोटरी क्लबचे मावळते विद्यमान अध्यक्ष युसुफखान पठाण यांच्या अध्यक्षतेखाली शेवगाव येथे बुधवारी ( दि. १) रोजी झालेल्या बैठकीत या निवडी करण्यात आल्या. यावेळीएक जुलै हा डॉक्टर्स डे,सी.ए. डे व फार्मर्स डे असल्याने शेवगाव परिसरातील वैद्यकीय व कृषी क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.शेवगाव रोटरी क्लब सिटीची कार्यकारणी पुढील प्रमाणे – रो कैलास कचरे (सहसचिव), डॉ. काकासाहेब लांडे (सार्जंट ऑफ आर्म), रो प्रा. विजयकुमार मुधोळकर (क्लब एडमिनिस्ट्रेशन), डॉ. गणेश चेके (कम्युनिटी सर्विस), डॉ विकास बेडके (कम्युनिटी सर्विस हेल्थ), रो मनीष बाहेती (पब्लिक इमेज), डॉ. संजय लड्डा (टी आर एफ डायरेक्टर),रो मोहम्मद वसीम (लिटरसी डायरेक्टर), डॉ मनीषा लढ्ढा (मेंबरशिप डायरेक्टर), रो.डॉ मयूर लांडे (युथ हॅन्ड वोकेशनल सर्विस डायरेक्टर) रोटरी क्लब चे सहप्रांतपाल भागनाथ काटे यावेळी उपस्थित होते. शेवटी सचिव रोटरीन प्रा. विजयकुमार मुधोळकर यांनी आभार मानले.शेवगाव परिसरात महिला सबलीकरण, पर्यावरण समतोल व आरोग्य विषयक जनजागृती आणि उपाययोजना या विषयावर प्रामुख्याने या वर्षात काम करणार असल्याचे यावेळी बोलताना नूतन अध्यक्ष डॉ. बिहानी व सचिव प्रा. लोंढे यांनी सांगितले.

COMMENTS