Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तरडगाव येथे आज धावणार बैलगाड्या

तरडगाव :बैलगाडीच्या शर्यतीसाठी बनविलेल्या फाट्या. (छाया : सुशिल गायकवाड) तरडगाव / प्रतिनिधी : तरडगाव, ता. फलटण येथे श्री भैरवनाथ यात्रा तुळजाभवानी

सातारा जिल्हा वार्षिक योजनेसाठी 400 कोटी रुपयांचा निधी : उपमुख्यमंत्री
बुलढाणा जिल्ह्यात सूक्ष्म सिंचन पद्धतीला शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद
तुळसण येथे बिबट्या दुचाकीच्या आडवा : चालक जखमी

तरडगाव / प्रतिनिधी : तरडगाव, ता. फलटण येथे श्री भैरवनाथ यात्रा तुळजाभवानी काठी व श्री छत्रपती शिवजयंतीनिमित्त भव्य बैलगाड्यांच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले असून शुक्रवार, दि. 29 रोजी बैलगाड्या धावणार आहेत. बैलगाडी शर्यत प्रेमींसाठी ही पर्वणी असून ही शर्यत मॅग्नेशिया कंपनीच्या मागे थाप्याचा माळ येथे होणार आहे. या शर्यतीचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी एकूण पाच बक्षीसे देण्यात येणार असून बक्षीस वितरण कार्यक्रम हा विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
प्रथम क्रमांकाचे बक्षीस 41 हजार रुपये हेे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्याकडून देण्यात आले आहे. द्वितीय क्रमांकाचे बक्षिस आ. दीपक चव्हाण यांच्याकडून 31 हजार रुपये, तृतीय क्रमांकाचे 21 हजार रुपये बक्षीस फलटण पंचायत समितीचे माजी सभापती वसंतराव गायकवाड यांच्याकडून तसेच सुभाषराव गायकवाड व भगवानराव होळकर यांच्या वतीने चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस 11 हजार रुपये आणि तरडगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य प्रशांत गायकवाड यांच्याकडून 7 हजार रुपयांचे पाचवे बक्षिस देण्यात येणार आहे. प्रवेश फी 1 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. बैल गाडी शर्यतीसाठी मैदान सुसज्ज असे करण्यात आली असून फाटे व्यवस्थित आखण्यात आले आहेत. बैलजोडी एका फाट्यातून धावत राहील अशा पध्दतीची आखणी केली आहे. दोन्ही फाट्यातील अंतर 14 फूट इतके ठेवण्यात आले आहे. बैलगाडी प्रेमींनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केलेले आहे.

COMMENTS