Homeताज्या बातम्या

50 किलो पॉपी स्ट्रॉ जप्त; 15.09 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नांदेड जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अमली पदार्थांविरोधातील विशेष मोहिमेदरम्यान मोठी कारवाई करत 50 किलो 630 ग्रॅम पॉपी स्ट्रॉ (बोंडे त

पुण्यात एक तरुण २ तास झुलत उभा; शहरात ‘झोंबी ड्रग्ज’चा शिरकाव?
नांदेड परिक्षेत्रात गुटखा विरोधी मोहिमेचा धडाका
मिरजगावमध्ये प्रतिबंधित इंजेक्शनचा मोठा साठा जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करत ५८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत



नांदेड जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अमली पदार्थांविरोधातील विशेष मोहिमेदरम्यान मोठी कारवाई करत 50 किलो 630 ग्रॅम पॉपी स्ट्रॉ (बोंडे तुकडे) जप्त केले. या कारवाईत एक चारचाकी, एक दुचाकी आणि अमली पदार्थांसह एकूण 15 लाख 9 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 30 जून रोजी साईबाबा मंदिर परिसर, जुना कौठा येथे सापळा रचून गुजरात नोंदणी क्रमांकाच्या कारची तपासणी केली. वाहनातून पॉपी स्ट्रॉ आढळून आल्यानंतर प्रीतसिंग रामसिंग पुजारी (वय 23) व श्यामला चिंतामणी पोहरे (वय 45, दोघेही नांदेड) यांना ताब्यात घेण्यात आले. कारवाईत पॉपी स्ट्रॉसह कार व दुचाकी जप्त करण्यात आली.  प्राथमिक चौकशीत हा अमली पदार्थ मध्यप्रदेशातील नीमच जिल्ह्यातील दोन फरार आरोपींकडून खरेदी केल्याची माहिती समोर आली असून, पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली असून, जिल्ह्यात अमली पदार्थ व इतर अवैध धंद्यांविरोधातील मोहीम यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

COMMENTS