येणाऱ्या 15 दिवसात शिवसेना भवन सुद्धा एकनाथ शिंदेच्या ताब्यात राहील- आ.रवी राणा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

येणाऱ्या 15 दिवसात शिवसेना भवन सुद्धा एकनाथ शिंदेच्या ताब्यात राहील- आ.रवी राणा

अमरावती प्रतिनिधी - निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्यानंतर आता येणाऱ्या पंधरा दिवसात शिवसेना भवन सुद्धा एकनाथ शिं

अमरावतीमध्ये बच्चू कडू यांचे शक्तीप्रदर्शन
बच्चू कडू हे नौटंकी छाप आमदार आहेत – आ. रवी राणा
आरती सिंग यांचा रवी राणांवर पलटवार

अमरावती प्रतिनिधी – निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्यानंतर आता येणाऱ्या पंधरा दिवसात शिवसेना भवन सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात राहील व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या ठिकाणी बसतील अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी दिली. बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना ही एकनाथ शिंदेंसोबत आहे. 90 टक्के पेक्षा जास्त सच्चे शिवसैनिक बाळासाहेबांच्या विचाराचे लोक हे मुख्यमंत्र्यांसोबत आहे.त्यामुळे त्यांचं बहुमत सिद्ध होतं आहे. येणाऱ्या काळात उद्धव ठाकरे यांच्यासोबत फक्त अनिल परब, संजय राऊत,आणि आदित्य ठाकरे हे तिघेच राहतील अशी प्रतिक्रिया आ. रवी राणा यांनी दिली

COMMENTS