किनवट येथील साने गुरुजी हॉस्पिटल (कोठारी) परिसरात झालेल्या चोरीच्या घटनेचा किनवट पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास करत पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी प

किनवट येथील साने गुरुजी हॉस्पिटल (कोठारी) परिसरात झालेल्या चोरीच्या घटनेचा किनवट पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास करत पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीला गेलेले बांधकाम साहित्य आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण 1 लाख 21 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 1 जुलै 2026 रोजी किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 148/2026, बीएनएस कलम 303(2), 305, 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. साने गुरुजी हॉस्पिटल, कोठारी येथे ही चोरी झाली होती. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून किनवट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तातडीने चक्र फिरवली. गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. जेरबंद केलेले आरोपी नामे अविनाश बालाजी मुंडे (वय 35 वर्षे, रा. दुधगाव, ता. किनवट, जि. नांदेड), दशरथ मारोती बेलखोडे (वय 65 वर्षे, रा. जिजामाता वार्ड, वरोरा, जि. चंद्रपूर, ह.मु. साने गुरुजी हॉस्पिटल कोठारी, ता. किनवट) पोलिसांनी आरोपींकडून चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे. यामध्ये खालील साहित्याचा समावेश आहे: वॉल पुटी: एशियन पेंट्स कंपनीचे प्रत्येकी 40 किलोचे 40 पोते (किंमत रु. 41,600/-) बर्जर कंपनीचे ’प्रायमर’ 20 लिटरचे 10 सीलबंद बकेट (किंमत रु. 27,200/-) 2 बाय 4 फूट आकाराच्या 32 नग टाईल्स (किंमत रु. 9,600/-) आणि 2 बाय 2 फूट आकाराचे कापलेले 30 तुकडे (किंमत रु. 3,000/-) गुन्ह्यात वापरलेली बजाज प्लेटिना मोटरसायकल (क्रमांक एम.एच.26 बि.आर 0775, अंदाजे किंमत रु. 40,000/-) ही धडक कारवाई किनवट पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक लेनगुळे, हेड कॉन्स्टेबल मेडके, हेड कॉन्स्टेबल मुंडे आणि पोलीस कॉन्स्टेबल जाधव यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. गुन्ह्याचा पुढील तपास किनवट पोलीस करत आहेत. पोलिसांच्या या जलद कारवाईमुळे परिसर आणि व्यापारी वर्गातून कौतुक होत आहे.

COMMENTS