Homeताज्या बातम्या

कार्यालयीन स्वच्छता, लोकाभिमुख प्रशासनावर भर; सीईओ महेश पाटील यांची विविध विभागांना भेट

नांदेड जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक महेश पाटील यांनी गुरुवारी पदभार स्वीकारल्यानंतर विविध विभागांना प्रत्यक्ष भेट देत

देगलूर नाका परिसरात मेडिकल नशेखोरांचा अड्डा?अल्पवयीनांना जाळ्यात ओढण्याचा गंभीर आरोप, प्रशासनाच्या तातडीच्या कारवाईची मागणी
लोकमंथन इफेक्ट : राहाता ग्रामीण रुग्णालयात पाण्याची व्यवस्था सुरु 
माझी बदली करा, मी खूप त्रासात आहे… आरोग्यमंत्र्यांचे पाय धरून ढसाढसा रडली महिला नर्स; जोधपूरमधील भावुक व्हिडिओ व्हायरल!


नांदेड जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक महेश पाटील यांनी गुरुवारी पदभार स्वीकारल्यानंतर विविध विभागांना प्रत्यक्ष भेट देत कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. कार्यालयीन स्वच्छता, नागरिकांना वेळेत सेवा आणि पारदर्शक प्रशासनाला प्राधान्य देण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी विभागप्रमुखांना दिल्या.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. महेश पाटील यांनी सामान्य प्रशासन, ग्रामपंचायत, आरोग्य, लेखा, ग्रामीण पाणीपुरवठा, बांधकाम, शिक्षण आदी विभागांना भेटी देऊन कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी केली. विविध विभागांतील प्रलंबित कामे, नागरिकांना दिल्या जाणार्‍या सेवा तसेच कार्यालयीन व्यवस्थेबाबत त्यांनी सविस्तर माहिती घेतली. यावेळी त्यांनी प्रत्येक कार्यालय स्वच्छ, सुटसुटीत आणि लोकाभिमुख असावे, असा आग्रह धरला. कार्यालय परिसराची नियमित स्वच्छता राखून नागरिकांना सकारात्मक वातावरणात सेवा मिळेल, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच जिल्हा परिषदेत विविध कामांसाठी येणार्‍या नागरिकांची प्रकरणे वेळेत निकाली काढावीत, कोणत्याही नागरिकाला अनावश्यक हेलपाटे मारावे लागू नयेत आणि प्रत्येक विभागाने जबाबदारीने काम करून सेवा वितरण अधिक परिणामकारक करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. भेटीदरम्यान त्यांनी विभागप्रमुख व कर्मचार्‍यांशी संवाद साधून प्रत्येक विभागाच्या कार्यपद्धतीची माहिती जाणून घेतली. कार्यक्षम, पारदर्शक आणि लोककेंद्रित प्रशासनासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून नागरिकांना दर्जेदार व तत्पर सेवा द्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

COMMENTS