Homeताज्या बातम्या

नागेश विद्यालयात वृक्षारोपण उत्साहात 

जामखेड : सहकार सप्ताहानिमित्त वै. विठ्ठलराव राऊत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जामखेड येथील श्री नागेश विद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. नागेश विद्यालय स्कूल समिती सदस्य तथा श्री संत गोरोबा काका कुंभार नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन विनायक राऊत यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात पर्यावरण संवर्धनासह सहकार चळवळीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक निबंधक दिलीप तिजोरे तर प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर विभाग सल्लागार समिती सदस्य राजेंद्रजी कोठारी, पुणे विद्यापीठ सिनेट सदस्य प्रा.मधुकर राळेभात, नगरसेविका हिना सय्यद, नगरसेवक मोहन पवार, प्रकाश सदाफुले, सुरेश भोसले, प्रा. शिवाजीराव ढाळे,  मुख्याध्यापिका भोर, प्रा.ज्ञानदेव कुंभार, अवधूत पवार, डॉ. सागर शिंदे, ऍड. अलताफ शेख,  प्रदीप टाफरे, वसीम शेख, अनिकेत पवार, विशाल वनवे, कॅप्टन भोरे मेजर, जितेंद्र बोरा, मुख्तार सय्यद ,संतोष बारगजे, आनंद राजगुरू, महेश राऊत ,संभाजी मुळे, नासीर सय्यद, बाबा चंदन, किसनराव पवार, वनरक्षक सुधाकर घोडके, महादेव डोके, इमरान तांबोळी आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना दिलिप तिजोरे म्हणाले की वाढती वृक्षतोड, बदलते हवामान आणि त्यातून निर्माण होणारे जागतिक संकटाचा सामना करावा लागत आहे. “बिना सहकार नाही उद्धार” या घोषवाक्याचा उल्लेख करत सहकाराच्या माध्यमातून दुर्बल घटकांचा विकास, संस्थांची प्रगती आणि समाजहित साध्य होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.यावेळी मधुकर राळेभात म्हणाल की माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या कार्यकाळातील दुष्काळाचा संदर्भ देत भविष्यातील पिढीला अशा संकटांना सामोरे जावे लागू नये, यासाठी आजपासून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करणे आवश्यक आहे. युरोपसारख्या थंड प्रदेशातही उष्माघातामुळे झालेल्या मृत्यूंचा दाखला देत त्यांनी पर्यावरण संरक्षणाचा प्रभावी संदेश दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंगळे यांनी केले, उपस्थितांचे आभार विनायक राऊत यांनी मानले. 

शहाम्मद शेख यांचे निधन
चिमुरड्यासह विवाहितेचा विहिरीत मृतदेहजामखेडमधील घटना; पोलिसांकडून तपास सुरू
गौरी शुगरचे मिल रोलर पूजन उत्साहात

COMMENTS