Homeताज्या बातम्या

लांजी ग्रामपंचायत कार्यालयात ’फार्मर कप 2026’ उपक्रमाचा शुभारंभ; शेतकर्‍यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

माहूर तालुक्यातील लांजी ग्रामपंचायत कार्यालयात सोमवारी (दि. 29 जून) ’फार्मर कप 2026’ या राज्यस्तरीय उपक्रमाचा डिजिटल शुभारंभ उत्साहात पार पडला. र

प्रवरेच्या कृषिदूतांचे चंद्रापूर येथे स्वागत
खा. डॉ.  गोपछडे यांच्या पाठपुराव्याला यशसगरोळी कृषी विज्ञान केंद्राचा ’निक्रा-टीडीसी’ कार्यक्रमात समावेश
कृत्रिम बुद्धिमत्ता, मानवी संवेदना आणि पारंपरिक ज्ञानाच्या समन्वयातून पशुपालनात भरभराट आणा : पंकजा मुंडेएकात्मिक दुग्धव्यवसाय विकास उपक्रमाचे उद्घाटन; शेतकर्‍यांच्या उत्पन्नवाढीस चालना



माहूर तालुक्यातील लांजी ग्रामपंचायत कार्यालयात सोमवारी (दि. 29 जून) ’फार्मर कप 2026’ या राज्यस्तरीय उपक्रमाचा डिजिटल शुभारंभ उत्साहात पार पडला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेल्या उद्घाटन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण ग्रामपंचायत कार्यालयात दाखविण्यात आले. या कार्यक्रमाला तालुक्यातील शेतकर्‍यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमात शेतकरी गटांच्या माध्यमातून शेतीतील नवकल्पना, उत्पादनवाढ, शाश्वत शेती पद्धती आणि सामूहिक सहभागाचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच स्पर्धेची उद्दिष्टे, नोंदणी प्रक्रिया आणि सहभागाचे निकष याबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली. यावेळी पोखर्णी (नांदेड) येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ देवकांत देशमुख यांनी शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी ए. एम. एलपलवाड, लांजीचे सरपंच मारोती रेकुलवार, कृषी पर्यवेक्षक विनोद कदम, अमित पवार, पाणी फाउंडेशनचे सतीश भिसे, कृषी पर्यवेक्षक सुधीर राजूरकर, आत्मा तालुका तंत्र व्यवस्थापक महेश तहाडे, समूह सहाय्यक दवणे, कानिंदे, समन्वयक नितेश बनसोडे तसेच कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. यावेळी अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांना एकत्रितपणे स्पर्धेत सहभागी होऊन आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याचे आवाहन केले. एकत्रित प्रयत्न, सक्षम शेतकरी; फार्मर कप 2026 यशस्वी करूया, असा संदेश देत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

COMMENTS