आनंद ग्रामीण विकास प्रतिष्ठाण, आनंदगाव (ता. केज, जि. बीड) आणि स्वानंद सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (1 जुलै) महाराष्ट्राचे

आनंद ग्रामीण विकास प्रतिष्ठाण, आनंदगाव (ता. केज, जि. बीड) आणि स्वानंद सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (1 जुलै) महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषीदिन, परिसंवाद आणि शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थांचे संस्थापक, ज्येष्ठ विचारवंत व समाजसेवक डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड होते.
परिसंवादात माजी सरपंच रामराजे गायकवाड, रावसाहेब जाधव, ए. बी. गायकवाड आणि एस. के. वैरागे यांनी आधुनिक शेती, कृषी विकास आणि शेतकर्यांसमोरील आव्हानांवर मार्गदर्शन केले. त्यानंतर झालेल्या शेतकरी मेळाव्यात ज्ञानेश्वर गायकवाड, रविंद्र गायकवाड, अमोल गायकवाड, वामन गायकवाड, बिरुबापू सौदागर, बन्सीनाना गायकवाड, गौरी गायकवाड, दिव्या साबळे आणि कल्याणी घोगले यांनी विविध कृषी विषयांवर माहिती दिली. अध्यक्षीय समारोपात बोलताना डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड म्हणाले की, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे हरितक्रांतीचे खरे प्रणेते होते. त्यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण राज्यात कृषीदिन साजरा केला जातो. त्यांच्या दूरदृष्टीमुळे महाराष्ट्राच्या शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढला, सिंचन सुविधा विस्तारल्या आणि शेतीची उत्पादकता लक्षणीयरीत्या वाढली. ते पुढे म्हणाले की, वसंतराव नाईक यांच्या कार्यकाळात धरणे, मातीबंधारे, सिमेंट बंधारे, पाणी अडवा-पाणी जिरवा, मृदसंधारण, फलोत्पादन, सुधारित बियाणे, खते, कीटकनाशके तसेच विहिरी, कूपनलिका, वीज, मोटारी आणि पाइपलाइन यांसारख्या सुविधा शेतकर्यांपर्यंत पोहोचविण्यात आल्या. त्यामुळे महाराष्ट्रातील शेती हिरवीगार झाली आणि शेतकर्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडले. यावेळी संस्थेच्या वतीने 30 जून रोजी गुरु गोविंदसिंग जयंती साजरी करण्यात आल्याची तसेच 28 जून रोजी आयोजित रंगभरण स्पर्धेत गौरी गायकवाड हिने प्रथम, तर कृष्णराजे गायकवाड यांनी द्वितीय क्रमांक मिळविल्याची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन संस्थेचे व ग्रंथालयाचे विश्वस्त आनंद भैय्या गायकवाड यांनी केले.

COMMENTS