Homeताज्या बातम्या

चांदे बुद्रुकमध्ये पर्यावरणपूरक वटपौर्णिमा

मिरजगाव : वटपौर्णिमेनिमित्त वडाच्या झाडाला दोरा गुंडाळून प्रदक्षिणा घालण्याच्या पारंपरिक प्रथेला पर्यावरणपूरक पर्याय देत अंधश्रद्धा निर्मूलन समित

देवळाली प्रवरात जादूटोण्याचा संशयघरातील वस्तू अचानक पेटल्याने खळबळ
माहूर तालुक्यात जादूटोणा विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी तहसीलदार -जगताप
रुढींना फाटा देत ‘देहदानाचा’ आदर्श! वडिलांचे पार्थिव वैद्यकीय शिक्षणासाठी दान; राहात्यातील गांधी कुटुंबाचा निर्णय

मिरजगाव : वटपौर्णिमेनिमित्त वडाच्या झाडाला दोरा गुंडाळून प्रदक्षिणा घालण्याच्या पारंपरिक प्रथेला पर्यावरणपूरक पर्याय देत अंधश्रद्धा निर्मूलन समिती, कर्जत आणि नागर फाउंडेशन यांच्या वतीने चांदे बुद्रुक येथे वडाच्या रोपांची लागवड करण्यात आली. महिलांनी वडाच्या झाडाला दोरा गुंडाळण्याऐवजी वडाची रोपे लावून वटपौर्णिमा साजरी केली.अहिल्यानगर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर आनाप यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.यावेळी कर्जत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तालुकाध्यक्ष तानाजी डाडर यांनी वडाच्या वृक्षाचे पर्यावरणीय तसेच मानवी जीवनातील महत्त्व विशद केले. या प्रसंगी राघु जगधने, बाळासाहेब जगधने, प्रशांत सूर्यवंशी, बापू जगधने, सूर्यभान सूर्यवंशी, ज्ञानदेव जगधने, बापू सूर्यवंशी, आबासाहेब जगधने, मनोहर दुनघव आणि राजू सूर्यवंशी उपस्थित होते.वडाच्या रोपांची लागवड नागलवाडीच्या माजी सरपंच वर्षा डाडर, सामाजिक कार्यकर्त्या रूपाली सूर्यवंशी, बायडाबाई दुनघव, आशाबाई जगधने, त्रिवेणी गंगावणे, इंदुबाई जगधने, ताराबाई गंगावणे आणि चक्कू काळे यांच्या हस्ते करण्यात आली. महिलांनी परंपरेबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वडाच्या रोपांची लागवड केल्याने या उपक्रमाचे परिसरात स्वागत करण्यात आले.

COMMENTS