Homeताज्या बातम्याअहमदनगर

देवळाली प्रवरात जादूटोण्याचा संशयघरातील वस्तू अचानक पेटल्याने खळबळ

देवळाली प्रवरा : देवळाली प्रवरा शहरातील लक्ष्मणनगर परिसरात एका घरात गेल्या चार वर्षांपासून घडत असलेल्या विचित्र प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घरातील कपडे, कागदपत्रे तसेच इतर वस्तू अचानक पेट घेत असल्याचा दावा संबंधित कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून “घरात जादूटोणा करण्यात आला आहे” असा संशय व्यक्त केला जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, साईनाथ कैलास रणधिर आणि सचिन कैलास रणधिर यांच्या कुटुंबीयांच्या घरात हे प्रकार वारंवार घडत आहेत. घरात एकूण ९ सदस्य वास्तव्यास असून गेल्या काही दिवसांत कपडे, फ्रीजजवळील साहित्य तसेच स्वयंपाकघरातील काही वस्तूंना अचानक आग लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत. काही ठिकाणी लिंबू-मिरची, कुंकू आणि इतर संशयास्पद वस्तू आढळल्याचेही कुटुंबीयांनी सांगितले.घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. “ही घटना नेमकी कशामुळे घडते आहे?” याबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात असून काहींनी यामागे अंधश्रद्धेचा प्रकार असल्याचे म्हटले आहे.दरम्यान, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर अनाप यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. त्यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून या घटनेची वैज्ञानिक दृष्टिकोनातून तपासणी केली जाणार असल्याचे सांगितले.पोलिसांकडूनही घटनेची माहिती घेण्यात आली असून नेमके कारण काय, याचा शोध सुरू आहे. लक्ष्मणनगर परिसरातील ही घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

  अंगणवाडी मदतनीस महिला कर्मचाऱ्यास मारहाण
अवैध गर्भलिंग निदान प्रकरणी  मेडिकल चालकास अटक
जबरी चोरी करणारी सराईत टोळी जेरबंदस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ; 11 लाखांचा मुद्देमाल जप्त

COMMENTS