Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

NEET पेपरफुटी प्रकरणात नांदेड कनेक्शन उघड; कदम कुटुंबाला सीबीआयचे पुण्यात हजर राहण्याचे आदेश

१२० गुणांवरून थेट ५६० पर्यंत झेप; 'कुलकर्णी गुरुजी' नेटवर्क, कोचिंग रॅकेट आणि शैक्षणिक दलाल सीबीआयच्या रडारवर नांदेड : देशभरात खळबळ उडवून देणा

किनवटमध्ये अजब प्रकार; भूमी अभिलेख कार्यालयाची इमारत रातोरात भुईसपाट, कोट्यवधींचा शासकीय भूखंड हडप करण्याचा डाव?
कसारपेठेत हातभट्टी दारू अड्ड्यावर पोलिसांची धडक कारवाई; २५ हजारांचे रसायन नष्ट, गावपातळीवरील जबाबदारांनाही कारवाईचा इशारा
आरोपींसोबत जंगी वाढदिवस आणि फटाक्यांची आतषबाजी; अर्धापूरच्या एपीआयच्या पार्टीमुळे नांदेड पोलीस दलाची प्रतिष्ठा चव्हाट्यावर!

१२० गुणांवरून थेट ५६० पर्यंत झेप; ‘कुलकर्णी गुरुजी’ नेटवर्क, कोचिंग रॅकेट आणि शैक्षणिक दलाल सीबीआयच्या रडारवर

नांदेड : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या ‘नीट-युजी २०२६’ (NEET-UG 2026) पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता थेट नांदेडपर्यंत पोहोचल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात शहरातील कदम कुटुंबातील एका विद्यार्थिनीची केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) तब्बल आठ तास कसून चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित विद्यार्थिनी व कदम कुटुंबीयांना मंगळवारी पुण्यातील सीबीआय कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, सराव परीक्षांमध्ये अवघे १२० गुण मिळवणाऱ्या विद्यार्थिनीने अंतिम नीट परीक्षेत तब्बल ५६० गुण मिळवल्याने तपास यंत्रणांचे कान टवटवले आहेत. या अनैसर्गिक झेपेशी संबंधित ‘गेस पेपर’, कोचिंग नेटवर्क आणि कथित सेटिंगचा वापर झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तपास यंत्रणांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लातूरमधील प्रा. कुलकर्णी यांच्याशी संबंधित काही शैक्षणिक मध्यस्थ नांदेडमध्ये सक्रिय असल्याचे समोर आले आहे.

वैद्यकीय प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका किंवा संभाव्य प्रश्न उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली लाखो रुपयांचे व्यवहार झाल्याचा संशय सीबीआयला आहे. शनिवारी रात्री सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने शहरातील विद्युत नगर परिसरात अचानक धाड टाकून चौकशी सुरू केली. या कारवाईदरम्यान मोबाईल कॉल रेकॉर्ड, आर्थिक व्यवहार, डिजिटल संपर्क आणि बँक व्यवस्थेची माहिती गोळा करण्यात आली आहे. तपास वाहनांवर मुंबई, पुणे आणि लातूर येथील नोंदणी क्रमांक असल्याने या संपूर्ण रॅकेटचे जाळे राज्यात पसरल्याची चर्चा सुरू झाली आहे.

मध्यस्थांनीच गिळंकृत केले लाखो रुपये? प्राथमिक तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर येत आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांकडून उकळण्यात आलेल्या रक्कमेतील मोठा हिस्सा काही मध्यस्थांनी स्वतःकडेच ठेवल्याचा संशय आहे. अंतिम सेटिंगसाठी कमी रक्कम पुढे पाठवून उर्वरित पैसे दलालांनीच हडप केल्याची चर्चा तपास वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे हे प्रकरण केवळ पेपरफुटीपुरते मर्यादित नसून, त्यामागे बहुस्तरीय आर्थिक साखळी कार्यरत असल्याचे संकेत मिळत आहेत.

गुणांमधील संशयास्पद वाढ तपासाच्या केंद्रस्थानी सीबीआयने आता अशा विद्यार्थ्यांची स्वतंत्र यादी तयार करण्यास सुरुवात केली आहे, ज्यांच्या अंतिम निकालात अनपेक्षित वाढ दिसून आली आहे. वर्षभरातील टेस्ट सिरीज, प्रॅक्टिकल कामगिरी, सरासरी गुण आणि अंतिम नीट निकाल यांची तांत्रिक पडताळणी केली जात आहे. सराव परीक्षांमध्ये कमी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांनी अंतिम परीक्षेत अचानक उच्चांक गाठल्यास त्यांची स्वतंत्र चौकशी केली जाणार आहे.

COMMENTS