Homeताज्या बातम्या

रुग्णालयात तोडफोड; तिघांविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सोनई: नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील एका रुग्णालयात घडलेल्या तोडफोड प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहनाच

शेतकर्‍यांनी खरीप पेरणीपूर्वी बियाण्यांवर बीजप्रक्रिया करावी-जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे
नांदेडच्या नूतन जिल्हा पोलीस अधीक्षकपदी निलभ रोहन; पदभार स्वीकारला
अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासाठी स्वतंत्र टास्क फोर्स; महसूल मंत्री बावनकुळे यांचे कठोर कारवाईचे संकेत
कर्जतमध्ये हॉटेलमधील आचाऱ्याचा निर्घृण खून; उत्तर प्रदेशातील तीन आरोपींना  दौंड रेल्वेस्थानकावरून घेतले ताब्यात - Lokmanthan | लोकमंथन

सोनई: नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील एका रुग्णालयात घडलेल्या तोडफोड प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहनाचा कट लागल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर आरोपींनी रुग्णालयात घुसून कोयता व कुऱ्हाडीचा धाक दाखवत काचा व इतर साहित्याची तोडफोड केल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे रुग्णालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनिकेत राजेंद्र घोडेकर हे मारहाणीत जखमी झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल होते. त्याच वेळी आरोपींनी रुग्णालयात येऊन त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यात त्यांनी रुग्णालयातील काचा व इतर साहित्याची तोडफोड करून मोठे नुकसान केले.

या प्रकरणी करण उर्फ बुट्या भंडाळकर, उमेश उर्फ भोन्या शहागराव आणि शेख जहांगीर शेख यांच्याविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक नीरज राजगुरू यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास सोनई पोलीस करत आहेत.

दरम्यान, रुग्णालय हे रुग्णांना उपचारासाठी सुरक्षित ठिकाण मानले जाते. मात्र उपचार सुरू असताना रुग्णालयात घुसून तोडफोड व दहशत निर्माण झाल्याच्या घटनेमुळे सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अशा घटनांमुळे डॉक्टर, कर्मचारी आणि रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. खासगी तसेच ग्रामीण रुग्णालयांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा, सुरक्षा रक्षक आणि पोलिसांचा तातडीचा प्रतिसाद यंत्रणा अधिक सक्षम करणे आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

COMMENTS