Homeताज्या बातम्या

बदलापुरात माजी नगरसेवकावर हल्ला

हल्ल्यात माजी नगरसेवक आऊ मोरे जखमी

बदलापुर प्रतिनिधी - बदलापुरात येथे माजी नगरसेवक आऊ मोरे यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात माजी नगरसेवक आऊ मोरे हे जखमी झाले आहेत. मोर

गुहागरमध्ये दोन बसची समोरासमोर धडक
नगरच्या दोघांनी केली साडेनऊ कोटींची फसवणूक ;गुन्हा दाखल
मराठवाडा समृद्ध व्हावा हाच ध्यास ः मुख्यमंत्री शिंदे

बदलापुर प्रतिनिधी – बदलापुरात येथे माजी नगरसेवक आऊ मोरे यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात माजी नगरसेवक आऊ मोरे हे जखमी झाले आहेत. मोरे हे रात्री शिरगाव परिसरातील त्यांच्या घरी गाडीतून जात हाेते. त्यावेळी अज्ञात ४ ते ५ लाेकांनी त्यांची गाडी अडवली. यानंतर त्यांना गाडीतच मारहाण करण्यात आली. ही मारहाण ४ ते ५ जणांनी केल्याचे माेरे यांनी तक्रारीत म्हटले आहे. या हल्ल्यानंतर माेरे यांना बदलापूर ग्रामीण रुग्णालयात(Badlapur Rural Hospital) उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती वैद्यकीय अधिका-यांनी दिली.या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात( Badlapur East Police Station) अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. 

COMMENTS