Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोतुळमधील श्री वरदविनायक मंदिरात अथर्वशीर्षचे पठण

अकोले/प्रतिनिधीः ऋषिपंचमी निमित्त कोतुळ (ता.अकोले) येथील श्री वरदविनायक मंदिरात सामुदायिक अथर्वशीर्ष पठण बुधवारी पहाटे ठिक 6.00 वाजता भक्तीमय वात

मंगल दत्त क्षेत्रात आत्मिक समाधान मिळते- आ अरुण काका जगताप 
२०२४ ची कुस्ती देखील मी निकाली काढेल… सेटलमेंट करण्याचा माझा धंदा नाही…
Newasa : तालुक्यातील पाचुंदे येथे ग्रामसभेत राडा… | LokNews24 (Video)

अकोले/प्रतिनिधीः ऋषिपंचमी निमित्त कोतुळ (ता.अकोले) येथील श्री वरदविनायक मंदिरात सामुदायिक अथर्वशीर्ष पठण बुधवारी पहाटे ठिक 6.00 वाजता भक्तीमय वातावरणात संपन्न झाले. श्री गणेशाची उपासना ही ऐक्य, बंधुभाव वाढवणारी व राष्ट्रीय एकात्मता व कार्यक्षमता वाढवणारी आहे, म्हणून कोतूळ येथील प्राचीन व नवसाला पावणार्‍या श्री वरदविनायक मंदिरात जय भवानी संस्कृती संवर्धन मंडळाच्या वतीने ऋषिपंचमी निमित्त सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाचे आयोजन करण्यात आले होते.
कोतूळसारख्या ग्रामीण भागात जय भवानी संस्कृती संवर्धन मंडळाच्या वतीने सामुदायिक अथर्वशीर्ष पठण आयोजनाचे हे अकरावे वर्ष होते. शेकडो भाविकांचा वाढता प्रतिसाद हे या कार्यक्रमाचे आगळेवेगळे वैशिष्ट्य ठरले. बरोबर पहाटे सहा वाजता शंखनाद व ओमकाराच्या गजराने अथर्वशीर्ष पठणाची  सुरुवात झाली. हरि ओम नमस्ते गणपतये श्रश्र त्वमेव प्रत्यक्षम् तत्वमसीश्रश्र त्वमेव केवलम् कर्तासीश्रश्र हा मंत्रउच्चार  पहाटेच्या शांत वातावरणात शेकडोमुखातून एकाच वेळी उमटला. यावेळी मंदिर परिसरातील वातावरण चैतन्यमय झाले होते. अथर्वशीर्ष पठणाचे नेतृत्व कु.परिमल भाटे, वेदिका परशुरामी, राशी परशुरामी यांनी केले. एका स्वरातील मंत्र पठणाने परिसरातील वातावरण भक्तीमय झाले होते. रंजना व वसंत आभाळे यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली. देवस्थानच्या वतीने अध्यक्ष प्रदीप भाटे यांनी त्यांचा सन्मान केला. यावेळी डॉ. सुभाष सोमण, रमेश देशमुख, ह.भ.प.ईश्‍वर महाराज शास्त्री, वासुदेव साळुंके, अविनाश घाटकर, अनिल पाठक, बाळासाहेब पोखरकर, संभाजी पोखरकर, विशाल बोर्‍हाडे, दिपक राउत, गुरुप्रसाद धुमाळ, विश्‍वनाथ देशमुख हे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वासुदेव साळुंके, संभाजी पोखरकर, विनय समुद्र, विशाल बोर्‍हाडे, सचिन पाटील, निवृत्ती पोखरकर, वर्षा नेवासकर, वंदना पाठक, विद्या परशुरामी, सविता घाटकर, प्रियंका पाटील, द्वारका पोखरकर, प्रियांका नेवासकर आदींनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी ऋषीपंचमी निमित्त महिलांनी ऋषींचे पूजन केले. विद्या परशुरामी यांनी पोथी वाचन केले. यावेळी ह.भ.प. हिराबाई दुटे, नंदाताई शेळके, अनिता पोखरकर, अनुराधा पाठक यांच्यासह अनेक महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

COMMENTS