Homeताज्या बातम्या

करंजी ग्रामपंचायतीकडून खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना विविध विकासकामांसाठी निधीची मागणी

कोपरगाव शहर: करंजी गावचे सरपंच रवींद्र आगवन, उपसरपंच शिवाजी जाधव व ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब आगवन यांनी नुकतीच शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार

एअरबॅगचा अनपेक्षित स्फोट ठरला जीवघेणा; मीरा रोड परिसरात २५ वर्षीय कार विक्रेत्याचा दुर्दैवी मृत्यू
श्रद्धा कपूरचा ‘इठा’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; नाव बदलण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा
सौर ऊर्जा, जलसंधारणातील कामांची दखल; तिगावच्या सरपंच अर्चना राज पाटील यांना लोकमत सरपंच अवॉर्ड 2026

कोपरगाव शहर: करंजी गावचे सरपंच रवींद्र आगवन, उपसरपंच शिवाजी जाधव व ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब आगवन यांनी नुकतीच शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी गावच्या विविध प्रलंबित विकासकामांचे निवेदन देत निधीची मागणी केली.

करंजी ग्रामपंचायतीच्या वतीने खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना दिलेल्या निवेदनात गावातील अंतर्गत रस्त्यांवर पेव्हर ब्लॉक बसवणे, गावातील स्मशानभूमीचे सुशोभीकरण करणे, बिरोबा मंदिर चौक सुशोभित करणे तसेच ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीवर सर्वसाधारण बैठकीसाठी हॉल बांधणे आदी महत्त्वाच्या कामांचा समावेश करण्यात आला आहे. गावाचा कायापालट करण्यासाठी या सर्व कामांना तातडीने निधी मिळणे गरजेचे असल्याचे सरपंच व उपसरपंचांनी खासदारांच्या निदर्शनास आणून दिले.

करंजी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी मांडलेल्या मागण्यांची दखल घेत खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी या सर्व विकासकामांसाठी निधी देण्यास सकारात्मक सहमती दर्शवली आहे. लवकरच या कामांसाठी आवश्यक निधी मंजूर केला जाईल, असे आश्वासनही त्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला दिले.

COMMENTS