Buldhana : राज्य परिवहन कर्मचाऱ्यांचा संप चिघळला (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Buldhana : राज्य परिवहन कर्मचाऱ्यांचा संप चिघळला (Video)

एस टी कामगारांना वेतन वेळेवर मिळत नाही, वार्षिक वेतनवाढ दर 3% व घरभाडे भत्याचा दर 8/16/24% लागू केलेला नाही कामगार कराराच्या तरतुदीनुसार शासकीय कर्मच

दोन मित्रांचा जागीच मृत्यू | LOK News 24
काँग्रेस नेते थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त किर्तन महोत्सव
शिष्या पाठोपाठ गुरूचीही चमक!

एस टी कामगारांना वेतन वेळेवर मिळत नाही, वार्षिक वेतनवाढ दर 3% व घरभाडे भत्याचा दर 8/16/24% लागू केलेला नाही कामगार कराराच्या तरतुदीनुसार शासकीय कर्मचाऱ्यांना लागू होणारा महागाई भत्ता कामगारांना लागू करण्याचे मान्य केले असतांनाही शासन निर्णया नुसार महागाई भत्ता दर  जुलै 2018 ते  सप्टें 2018 या कालावधीची तीन महिन्याची 2% तर  जाने 2019 ते  सप्टें 20 19 या कालावधीची नऊ महिन्याची 3% महागाई भत्ता थकबाकी तसेच  डिसेंबर 2019 पासून 12% वरून 17 % असा लागू करून सदर वाढीव महागाई भत्ता कामगारांना लागू करन्यात यावा. राज्य शासनाने 01 ऑक्टोबर 2021 पासून 17 % वरून 28 % अशी वाढ केलेली असून ऑक्टोबर 2021 च्या वेतन सोबत रोखीने देण्याचा मान्य केला आहे. सदर महागाई भत्ता बाबतीत रा.प. कामगारांवर अन्याय होत आहे ऑक्टोबर 2021 चे वेतन दिवाळी पूर्वी मिळावे, सन उचल रक्कम शासकीय नियम प्रमाणे 12,500/- मिळावे दिवाळी भेट रक्कम 15,000 /- दिवाळी पूर्वी देण्यात यावी.आदि मागण्यांसाठी बुलडाणा आगारातील सर्व राज्य परिवहन.कर्मचारी कालपासून विभागीय कार्यालया समोर उपोषणास बसले आहेत तर रा.प.प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे संप चिघळला असुन आज सकाळपासून आगारातील एकही गाडी बाहेर निघू न दिल्याने प्रवाशांचा संताप अनावर झाला होता तर या संपा बाबतीत आगार व्यवस्थापकांना विचारले असता त्यांनी मौन धारण करून बोलण्यास नकार दिला.या संपाचे नेतृत्व राजेंद्र पवार, आर एल गवई,, किशोर जाधव, अरुण जगताप यांच्यासह विविध संघटनांचे कर्मचारी करत आहेत

COMMENTS