Homeताज्या बातम्या

राज्यस्तरीय कृषी पुरस्कार सोहळा: १८९ शेतकरी आणि अधिकाऱ्यांचा होणार गौरव; कृषी दिन सोहळ्याचे आयोजन

हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 'कृषी दिन' साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून मह

राजर्षि शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज दादरमध्ये ‘जागर समतेचा’ विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
मध्यरात्री सिनेस्टाईल पाठलाग; गोतस्करीचा मोठा डाव वडवणी पोलिसांनी उधळला
समान नागरी कायद्याच्या दिशेने पण..!

हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त ‘कृषी दिन’ साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र कृषी विभागामार्फत १ जुलै २०२६ रोजी वरळी (मुंबई) येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

या सोहळ्यात २०२३ आणि २०२४ या वर्षातील राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांचे वितरण राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कृषी, फलोत्पादन, सेंद्रिय शेती, कृषी विस्तार आणि विकास क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या एकूण १८९ शेतकरी, संस्था आणि कृषी अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.

या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार, महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले, कृषी राज्यमंत्री अ‍ॅड. आशिष जयस्वाल आणि मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

कृषी क्षेत्रातील उत्कृष्टतेचा सन्मान करून इतर शेतकऱ्यांना प्रेरणा देणे हा या पुरस्कारांचा मुख्य उद्देश आहे. यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषीभूषण, जिजामाता कृषीभूषण, कृषीभूषण (सेंद्रिय शेती), वसंतराव नाईक शेतीमित्र, युवा शेतकरी, उद्यानपंडित, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी (सर्वसाधारण गट/आदिवासी गट) तसेच पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार अशा विविध पुरस्कारांचा समावेश आहे.

COMMENTS