Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला विराम ः मंत्री भुजबळ

मुंबई : सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांना मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट शब्दां

नांदेड भाजपला धक्का : तरोडा-सांगवी मंडळ अध्यक्ष सुनील राणे यांचा राजीनामा, अंतर्गत अस्वस्थतेचा स्फोट
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नांदेड दौरा
आजचे राशीचक्र गुरुवार, ०४ नोव्हेंबर २०२१ अवश्य पहा (Video)
chagan bujbal

मुंबई : सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांना मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट शब्दांत विराम दिला आहे. सध्या विलीनीकरणाचा विषय आमच्यासमोर नाही, असे सांगत त्यांनी पक्षाचे तातडीचे प्राधान्य सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाला स्थिरता देणे हेच असल्याचे नमूद केले.
भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना विलीनीकरणाबाबत अनाठायी घाई केली जात असल्याचे सूचित केले. असा मोठा निर्णय तत्काळ न घेता दोन्ही बाजूंच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करूनच घ्यावा लागेल, असे ते म्हणाले. आजच ठरले पाहिजे अशा भूमिकेला काही अर्थ नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अलीकडेच अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर राज्यातील राजकारणात नव्या घडामोडींना वेग आला आहे. त्यानंतर काही स्तरांवर विलीनीकरणाबाबत चर्चा सुरू असल्याच्या दाव्यांवरही भुजबळ यांनी भाष्य केले. पक्षाची सध्याची दिशा नेतृत्व मजबूत करण्यावर केंद्रित असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड निश्‍चित असल्याचा पुनरुच्चार करत भुजबळ म्हणाले की, नव्या नेतृत्वाला वेळ देणे आवश्यक आहे. नवा कर्णधार आल्यानंतर त्यांना परिस्थिती समजून घेऊ द्यावे, संघटनात्मक बांधणी करू द्यावी आणि त्यानंतर पुढील निर्णय घ्यावेत, असे ते म्हणाले.

COMMENTS