Homeताज्या बातम्या

राजर्षि शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज दादरमध्ये ‘जागर समतेचा’ विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई: सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने राजर्षि शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त "जागर समतेचा" या विशेष सांस्क

समुपदेशनाद्वारे जिल्ह्यातील ८६ केंद्रप्रमुख पदांची नियुक्ती; प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण
बीड शहर परिसरात चालकावर प्राणघातक हल्ला करून लूट; ग्रामस्थांनी एका चोरट्याला पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात
श्री. राजाभाऊ लोमटे म्हणजे कामाप्रती प्रामाणिक आणि सहकार्य वृत्ती जोपासणारे व्यक्तिमत्त्व : मा. नवनाथराव थोटे

मुंबई: सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने राजर्षि शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त “जागर समतेचा” या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन आज शुक्रवार, दि. २६ जून २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता राजर्षि शाहू सभागृह, छत्रपती शिवाजी नाट्य मंदिर इमारत, दादर (पश्चिम), मुंबई येथे करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात विष्णू शिंदे आणि त्यांचे सहकलाकार समता, सामाजिक परिवर्तन आणि मानवतेचा संदेश आपल्या प्रभावी कलासादरीकरणातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचविणार आहेत. राजर्षि शाहू महाराज हे सामाजिक न्याय, समता, शिक्षणाचा प्रसार आणि सर्वसमावेशक समाजव्यवस्थेचे प्रणेते होते. शिक्षण, आरक्षण, सामाजिक सुधारणा आणि वंचित घटकांच्या उन्नतीसाठी त्यांनी केलेले कार्य भारतीय समाजजीवनात अतुलनीय मानले जाते. त्यांच्या याच पुरोगामी विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

“जागर समतेचा” हा कार्यक्रम राजर्षि शाहू महाराजांच्या विचारांना आणि कार्याला कलात्मक अभिवादन करणारा उपक्रम आहे. लोककला, गीत, संगीत आणि प्रभावी सादरीकरणाच्या माध्यमातून समता, बंधुता, सामाजिक ऐक्य आणि मानवतेचा संदेश रसिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा देणारे आणि समतेच्या मूल्यांचा गौरव करणारे हे सादरीकरण प्रेक्षकांना राजर्षि शाहू महाराजांच्या कार्याचा परिचय करून देईल. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासातील त्यांच्या योगदानाचे स्मरण करण्याचा हा एक महत्त्वपूर्ण सांस्कृतिक प्रयत्न आहे.

हा कार्यक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री डॉ. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन करणे, तसेच अभिजात कला, लोककला आणि थोर कलावंतांचे योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे हा या आयोजनामागील मुख्य उद्देश आहे.

COMMENTS