Homeताज्या बातम्या

आसाममध्ये ३.४ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के; कचार जिल्ह्यात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

गुवाहाटी: आसाममध्ये शनिवारी सकाळी मध्यम तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसल्याची घटना घडली आहे. पहाटे ४:५१:१६ वाजताच्या सुमारास हे भूकंपाचे धक्के जाणव

श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तपदी ढोरमले; जातेगाव येथे मान्यवरांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र प्रदान
अमृतवाहिनी पॉलिटेक्निकचा उत्कृष्ट निकाल; ८३ विद्यार्थ्यांना १०० पैकी १०० गुण, ६२४ विद्यार्थ्यांना थेट नोकरीची संधी
आंतरराष्ट्रीय एकल महिला दिनानिमित्त सात कर्तृत्ववान महिलांचा महापालिकेकडून गौरव
मोठी बातमी! या राज्यात भूकंपाचे धक्के, नागरिकांची धावाधाव; सगळीकडे भीतीचे  वातावरण - Marathi News | Assam earthquake 4 2 magnitude tremors felt across  districts northeast india | TV9 ...

गुवाहाटी: आसाममध्ये शनिवारी सकाळी मध्यम तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसल्याची घटना घडली आहे. पहाटे ४:५१:१६ वाजताच्या सुमारास हे भूकंपाचे धक्के जाणवले. भारतीय भूकंपशास्त्र केंद्रानुसार (NCS), या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.४ इतकी मोजली गेली आहे.

भूकंपाचा केंद्रबिंदू आसाममधील कचार जिल्ह्यात जमिनीखाली सुमारे ४२ किलोमीटर खोलीवर होता. तसेच भूकंपाच्या केंद्रबिंदूची नोंद २४.९४ उत्तर अक्षांश आणि ९२.५६ पूर्व रेखांशावर झाली आहे. पहाटेच्या वेळी अचानक भूकंपाचे धक्के जाणवताच नागरिक घाबरून घराबाहेर धावले.

सुदैवाने, या भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. प्रशासन सध्या परिस्थितीवर पूर्णपणे लक्ष ठेवून असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS