Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पर्यावरणरक्षक वनराईच्या टीमचे शेरी बु ! ग्रामपंचायत च्या वतीने स्वागत

कडा प्रतिनिधी - पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया यांनी पर्यावरण रक्षणासाठी वनराई संस्थेची स्थापना केली.  ’खेड्याकडे चला’ या महात्मा गांधींच्या विचारान

solapur:महावितरण अधीक्षक अभियंता कार्यालयात गुरा ढोरांसहित आंदोलन | LOKNews24
आपली पेन्शन आपल्या दारी मोहिमेला प्रथम पुरस्कार
पुरुषोत्तपुरी येथील महादेवाच्या पिंडी खाली निघाले सोन्याचे कासव

कडा प्रतिनिधी – पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया यांनी पर्यावरण रक्षणासाठी वनराई संस्थेची स्थापना केली.  ’खेड्याकडे चला’ या महात्मा गांधींच्या विचाराने प्रेरित होऊन व स्वराज्य संकल्पनेतुन डॉ.मोहन धारिया यांनी सन 10 जुलै, 1986 रोजी सार्वजनिक विश्वस्त कायद्यांतर्गत वनराई या संस्थेची स्थापना केली. राज्यातील प्रत्येक गावागावात ,वाडी वस्तीवर, शेताच्या बांधावर जाऊन मृदा-जल-वन संवर्धन
वनीकरण, वृक्ष लागवड करणे, वृक्षतोडीला आळा घालणे, वनसंवर्धना विषयी जनजागृती करून ‘वनराई’च्या माध्यमातून कार्यक्रम राबवले जाऊ लागले. संस्थेने नंतर वनीकरणाबरोबर जलसंवर्धन आणि मृदासंवर्धनाचे कार्य हाती घेतले हाच मूलमंत्र घेऊन वनराईच्या या संकल्पनेला प्रेरित होऊन आष्टी तालुक्यातील शेरी बु /खकळवाडी गावचे सरपंच संदिप खकाळ यांनी एल. टी. टी. एस व वनराई माध्यमातून गावाच्या विकासासाठी गावातील जेष्ठ व अनुभवी  नागरिकांना व  तरुणांना सोबत घेऊन आज शेरी बु येथे वनराई संस्था एकात्मिक ग्राम विकास प्रकल्पाच्या संयुक्त विद्यमाने पाणी आडवा पाणी जिरवा ह्या मूलमंत्राचा ध्यास घेऊन वनीकरण, मृद जल संवर्धन , रोजगार , वाचनालय, जिल्हा परिषद शाळा , बचत गट यांच्या उन्नतीसाठी काम करणार असून यासाठी गावाचा संपूर्ण अभ्यास एल.टी. टी. एस व वनराई संस्थेकडून गेल्या काही दिवसापासून गावातील प्रत्येक घरातील कुटुंबाचा बेसलाइन सर्व्हे करण्यात आला. आज वनराई संस्थेच्या वतीने शेरी बु / खाकळवाडी गावात प्रत्येक कुटुंबाचा चार दिवसापासून सर्व्हे करून तो पूर्ण झाला असून  गावातील प्रत्येक वस्तीवर जाऊन वनराई टीमच्या सदस्यांनी खूप चांगल्या प्रकारे सर्व्हे केला त्याबद्दल शेरी बु ग्रामपंचायत कडून त्यांचे स्वागत व कौतुक करून  ग्रामस्थांच्यावतीने वनराईच्या टीम मधील श्रीमती. देवकर मॅडम, सरडे सर, नरुटे सर, कृष्णा सर, विशाल सर, प्रिती मॅडम, मानसी मॅडम,निकिता मॅडम, अश्विनी मॅडम हजर राहून मोलाचे मार्गदर्शन व योगदान दिले. याबद्दल मा.श्री.संदिप साहेब खाकाळ यांनी आलेल्या टीमचे पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. यावेळी उपसरपंच श्री. दिपक सोनवणे, श्री.राहुल गोरे (शक्ती विध्यापिठ), नवनाथ वाघुले, परसराम शिरोळे, लाला शेख, किशोर सोनवणे, दयानंद भालेकर, प्रविण सोनवणे, विनायक गोरे, आजिनाथ शेंडे वैजनाथ भालेकर आदि ग्रामस्थ उपस्थित होते व कृष्णा डोरले यांनी ग्रामस्थांच्या वतीने आभार मानले.

COMMENTS