Homeताज्या बातम्या

सना मलिक यांचे विधान वैयक्तिक, पक्षाचा संबंध नाहीराष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी भूमिका केली स्पष्ट

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तिहेरी तलाक आणि समान नागरी कायद्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आघाडीत चर्चा रंगली असताना राष्ट्रवादी

शेतकर्‍यांचे अश्रू पुसण्यास सरकारला वेळ नाही : छत्रपती संभाजीराजे यांची सडकून टीका
सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार एकाच मंचावर येणार ?
मराठवाड्यात ५०० रुपयांच्या नोटांचा तुटवडा : अंबादास दानवे


मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तिहेरी तलाक आणि समान नागरी कायद्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आघाडीत चर्चा रंगली असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सना मलिक यांच्या विधानावरून निर्माण झालेल्या वादानंतर पक्षाने अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सना मलिक यांचे मत हे पूर्णपणे वैयक्तिक असून त्याचा पक्षाच्या भूमिकेशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.
तटकरे यांनी समाजमाध्यमावरील संदेशातून सांगितले की, विधानसभेतील चर्चेदरम्यान सना मलिक यांनी तिहेरी तलाकसंदर्भात व्यक्त केलेले विचार हे त्यांचे वैयक्तिक मत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या मताशी सहमत नाही आणि पक्षाची अधिकृत भूमिका वेगळी आहे. त्यांनी नमूद केले की, राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीच जात, धर्म आणि पंथ यांच्या पलीकडे जाऊन महिलांच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी ठाम भूमिका घेतली आहे. कोणत्याही महिलेच्या वैवाहिक आयुष्यावर अन्यायकारक पद्धतीने एकतर्फी निर्णयाची टांगती तलवार राहू नये, हा पक्षाचा मूलभूत दृष्टिकोन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सुनील तटकरे यांनी पुढे सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावर श्रद्धा ठेवणारा तसेच शिव, शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या विचारसरणीचा वारसा जपणारा पक्ष आहे. त्यामुळे तिहेरी तलाकसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आणि त्यानंतर संसदेत मंजूर झालेला कायदा हे अंतिम व सर्वोच्च मानले जातात. या निर्णयांचे पालन करणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. तथापि, लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक जनप्रतिनिधीला संविधानाने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले असल्याचे सांगत, सना मलिक यांनी व्यक्त केलेले विचार हे त्यांच्या वैयक्तिक भूमिकेच्या चौकटीतच पाहिले जावेत, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.

COMMENTS