Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार एकाच मंचावर येणार ?

बारामती प्रतिनिधी - लोकसभा निवडणूक जाहीर झाली आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये निवडणूक पार पडणार आहे. महाराष्ट्रातल्या बारामतीत काय होणार?

सोमनाथ जंगम यांचा डॉक्टर ऑफ सोशल वर्क किताबाने सन्मान
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये घेतला हुर्डा खाण्याचा आस्वाद
रावेर तालुक्यात लंपीचा मोठ्या प्रमाणात संसर्ग

बारामती प्रतिनिधी – लोकसभा निवडणूक जाहीर झाली आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये निवडणूक पार पडणार आहे. महाराष्ट्रातल्या बारामतीत काय होणार? याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे अशी होणारी लढत. महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे बारामतीत लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. तर महायुतीकडून सुनेत्रा पवार रिंगणात असतील. नणंद विरुद्ध भावजय असा हा सामना असणार आहे. अशात आज सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार एकाच व्यासपीठावर येणार आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात त्यांच्या वहिनी सुनेत्रा पवार लोकसभा लढणार आहेत. या नावाची घोषणा अद्याप झालेली नाही. गुरुवारी म्हणजेच २८ मार्चला या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या रिंगणात आमने-सामने उभ्या ठाकणार असल्याच्या चर्चा रंगल्यानंतर पहिल्यांदाच विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांची वहिनी सुनेत्रा पवार एकत्र एकाच मंचावर दिसणार आहेत. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संभाव्य उमेदवार सुनेत्रा पवार आगामी लोकसभा एकमेकांच्या विरोधात लढवणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. राजकीय वर्तुळात नणंद-भावजयीत रंगणाऱ्या या निवडणुकीच्या चुरशीची जोरदार चर्चा रंगली आहे. अशातच आता पुन्हा राजकीय वर्तुळात या नणंद-भावजयची चर्चा रंगली आहे. याचं कारण म्हणजे, लवकरच सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार एका मंचावर एकत्र दिसणार आहेत. बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथे संत तुकाराम महाराज बीज यानिमित्ताने एकत्र येण्याची शक्यता आहे.

COMMENTS