Homeताज्या बातम्या

देगलूरमध्ये ‘अंतरराष्ट्रीय विधवा दिन’ निमित्त ‘एकल महिला दिन’ उत्साहात साजरा

देगलूर: नगर परिषद देगलूर येथे माननीय मंत्री, महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य तसेच माननीय आयुक्त, महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र राज्य, पुण

लग्नपत्रिकेवर जन्मतारीख छापण्याचा निर्णय महत्त्वपूर्ण; सामाजिक कार्यकर्ते डॉ. गावीत्रे यांनी केले स्वागत
जि.प. व पं.स. निवडणुकांसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे – अशोक बुटले; अर्धापुरात जंगी स्वागत
२६ जून रोजी वीरशैव लिंगायत समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
Widows' Day Call for Justice, Not Symbolism

देगलूर: नगर परिषद देगलूर येथे माननीय मंत्री, महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य तसेच माननीय आयुक्त, महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या सूचनांनुसार ‘अंतरराष्ट्रीय विधवा दिन’ निमित्त ‘एकल महिला दिन’ अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.

यानिमित्ताने देगलूर शहरातील विधवा, घटस्फोटित व परित्यक्ता अशा विविध प्रकारच्या एकल महिलांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात शासनाचे ‘एकल महिला धोरण’ निश्चित करण्यासाठी महिलांकडून रोजगार, मालमत्ता हक्क, निवारा, शासकीय योजनांची अंमलबजावणी, न्यायालयीन प्रक्रियेतील कायदेशीर अडचणी तसेच एकल महिलांच्या सुरक्षेसंदर्भातील विविध अभिप्राय व महत्त्वपूर्ण सूचना नोंदविण्यात आल्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देगलूर नगर परिषदेचे स्वीकृत सदस्य सय्यद मोहियोद्दीन अहमदसाब हे होते. यावेळी नगर परिषद देगलूरच्या आस्थापना विभागाच्या डॉ. विजया येरगुलवार, लेखापाल स्वाती क्षत्रिय तसेच नारीशक्ती शहरस्तर संघाच्या अध्यक्षा श्रीमती शारदा सुभाष पाटील यांनी उपस्थित महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले. एकल महिलांनी स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वावलंबी बनून कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे स्वीकारावी आणि आपली आर्थिक व सामाजिक प्रगती साधावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमादरम्यान शहरातील काही यशस्वी एकल महिलांचा विशेष सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाला देगलूर शहरातील सुमारे २७० महिलांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नगर परिषद जन्म-मृत्यू विभागाच्या अश्विनी राठोड, नागमणी भुताळे तसेच (NULM) विभागाच्या ज्योती वाघमारे आणि कपिल कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरणाची गरज अधोरेखित

रोजगाराच्या संधी वाढविणे, मालमत्ता हक्कांचे संरक्षण, सुरक्षित निवार्‍याची व्यवस्था, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, न्यायालयीन प्रक्रियेतील अडचणी दूर करणे आणि एकल महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करणे, अशा विविध मुद्द्यांवर उपस्थित महिलांनी आपल्या सूचना मांडून शासनाकडे स्वतंत्र धोरणाची अपेक्षा व्यक्त केली.

COMMENTS