बीड: येथील सौ. केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ऊर्फ काकू कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागाने यंदाच्या परीक्षेत उल्लेखनीय यश

बीड: येथील सौ. केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ऊर्फ काकू कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागाने यंदाच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. नाट्यशास्त्र विभागातील डिप्लोमा कोर्समध्ये चि. अभिषेक इनकर तर प्रमाणपत्र कोर्समध्ये चि. अभिषेक घुले यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.
मार्च/एप्रिल २०२६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत नाट्यशास्त्र डिप्लोमा परीक्षेत अभिषेक इनकर याने ७२.४२ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला. तसेच प्रमाणपत्र परीक्षेत अभिषेक घुले याने ८० टक्के गुण मिळवून प्रथम स्थान पटकावले. या दोन्ही विद्यार्थ्यांनी मागील वर्षात ‘तीन पैशाचा तमाशा’ या नाटकात प्रभावी भूमिका साकारल्या होत्या. तसेच ‘आत कायं जळतंय’, ‘चेडा’, ‘भस्म्या’ यांसारख्या एकांकिकांमध्ये अभिनय करून अनेक पारितोषिके मिळवली आहेत.
त्यांच्या या यशाबद्दल नवगण शिक्षण संस्थेच्या सहसचिव डॉ. दीपाताई क्षीरसागर, सचिव डॉ. योगेश क्षीरसागर, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. सुधाकर गुट्टे, डॉ. विश्वंभर देशमाने, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवानंद क्षीरसागर, उपप्राचार्य तथा नाट्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संजय पाटील देवळाणकर, उपप्राचार्य डॉ. अनिता शिंदे, कमवि उपप्राचार्य डॉ. नारायण काकडे, पर्यवेक्षक प्रा. जालिंदर कोळेकर, प्रा. दुष्यंता रामटेक, प्रा. असलम शेख, प्रा. विजय राख आदींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

COMMENTS