Homeताज्या बातम्या

उपवर्गीकरणाविरोधातील लढा तीव्र; पनवेल ते चेंबूर ‘आरक्षण उपवर्गीकरणाची अंत्ययात्रा’

Oplus_16908288 बीड: अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या प्रस्तावाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला दिवसेंदिवस अधिक धार येत असून, बीड येथून

रस्त्यावरील कथित अतिक्रमण प्रकरण पुन्हा चर्चेत; जिल्हा परिषदेकडून चौकशीचे आदेश
खा. आष्टीकरांवर शिवसेना जिल्हाप्रमुख खराटेंचा घणाघाती हल्ला; राजीनामा देऊन पुन्हा मैदानात येण्याचे खुले आव्हान!
श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तपदी ढोरमले; जातेगाव येथे मान्यवरांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र प्रदान
Oplus_16908288

बीड: अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या प्रस्तावाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला दिवसेंदिवस अधिक धार येत असून, बीड येथून १० जून रोजी सुरू झालेला पायी लाँग मार्च आता मुंबईच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. आरक्षणातील उपवर्गीकरणाचा प्रस्ताव मागे घेण्याच्या मागणीसाठी निघालेल्या या मार्चची सांगता २६ जून रोजी दुपारी २ वाजता मुंबईतील चैत्यभूमी येथे होणार आहे.

आंदोलनाच्या अंतिम टप्प्यात उपवर्गीकरणाविरोधातील भूमिका अधिक तीव्र करण्यासाठी २५ जून रोजी पनवेल ते चेंबूर दरम्यान ‘आरक्षण उपवर्गीकरणाची अंत्ययात्रा’ काढण्याचा निर्णय आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे. या अनोख्या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाच्या धोरणांविरोधात निषेध नोंदविण्यात येणार असून राज्यभरातील भीमसैनिक, आंबेडकरी अनुयायी आणि सामाजिक न्यायाच्या चळवळीतील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने मुंबईत दाखल व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आंदोलनकर्त्यांच्या मते, अनुसूचित जातींमध्ये एकूण ५९ जातींचा समावेश असताना केवळ एका समाजाच्या मागणीला प्राधान्य देत उपवर्गीकरणाचा मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे अनुसूचित जातींच्या एकात्मतेला धक्का बसू शकतो तसेच आरक्षण व्यवस्थेवरही विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर समाजातील विविध घटक एकत्र येऊन हा संघर्ष उभारत असल्याचे आयोजकांनी सांगितले.

या पायी लाँग मार्चचे मुख्य संयोजक सिद्धार्थ शिनगारे, अजय सरवदे, प्रेम कांबळे आणि संदीप जाधव यांच्या नेतृत्वाखाली हजारो आंबेडकरी नागरिक सहभागी झाले आहेत. गेल्या पंधरा दिवसांहून अधिक काळ ऊन, वारा, पाऊस आणि विविध अडचणींचा सामना करत आंदोलनकर्ते मुंबईच्या दिशेने पायी वाटचाल करत आहेत. मार्गातील अनेक शहरांमध्ये आणि गावांमध्ये या मार्चचे उत्स्फूर्त स्वागत होत असून स्थानिक नागरिकांकडून आंदोलनकर्त्यांसाठी निवास, भोजन व अन्य आवश्यक सुविधांची व्यवस्था केली जात आहे. २६ जून रोजी चैत्यभूमी येथे होणार्‍या सांगता सभेकडे राज्यभरातील आंबेडकरी समाजाचे लक्ष लागले असून, या सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

COMMENTS