अमृतसर: दिल्लीहून अमृतसरसाठी उड्डाण केलेले एअर इंडियाचे एक विमान तांत्रिक बिघाडामुळे मार्ग भरकटून थेट पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रात घुसल

अमृतसर: दिल्लीहून अमृतसरसाठी उड्डाण केलेले एअर इंडियाचे एक विमान तांत्रिक बिघाडामुळे मार्ग भरकटून थेट पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रात घुसल्याची धक्कादायक घटना सोमवार रात्री घडली. या घटनेमुळे दोन्ही देशांच्या सुरक्षा यंत्रणांमध्ये काही काळ खळबळ उडाली होती. मात्र, पाकिस्तानच्या हवाई वाहतूक प्राधिकरणाने (CAA) तातडीने इशारा देऊन या विमानाला पुन्हा भारतीय हद्दीत परत पाठवले.
हे विमान दिल्लीहून अमृतसरच्या दिशेने येत होते. तांत्रिक बिघाडामुळे विमानाचा मार्ग बदलला आणि ते पाकिस्तानी हद्दीत दाखल झाले. पाकिस्तानने इशारा दिल्यानंतर विमान सुरक्षितपणे भारतीय हद्दीत परत आले खरे, पण तोपर्यंत अमृतसर विमानतळावर हवाई वाहतुकीचा ताण (रश) मोठ्या प्रमाणावर वाढला होता.
अमृतसर विमानतळावर उतरण्यास जागा उपलब्ध नसल्याने अखेर खबरदारीचा उपाय म्हणून हे विमान पुन्हा दिल्लीकडे वळवण्यात आले आणि तिथे सुरक्षितपणे उतरवण्यात आले. विमानामध्ये नेमका काय तांत्रिक बिघाड झाला होता आणि मार्ग कसा भरकटला, या गंभीर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू असल्याची माहिती विमानतळ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

COMMENTS