Homeताज्या बातम्या

सरसकट कर्जमाफीवर निर्णय न झाल्यास मराठवाडा पेटेल; आमदार रोहित पवार यांचा सरकारला थेट इशारा

कर्जत: विनाअट सरसकट शेतकरी कर्जमाफीच्या मागणीवरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसत आहेत. सरकारने तातडीने यावर निर्णय न घेत

“शिक्षण घेणे कधीही थांबवू नका, कारण जीवन कधीही शिकवणे थांबवत नाही” – अ‍ॅड. संजय रुईकर; होरायझन कॉलेजमध्ये प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे भव्य स्वागत
जर्मनीत रेल्वे सेवा झाली ठप्प! डिजिटल संचार यंत्रणेतील तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांचे मोठे हाल
शोल्डर- मलबार हिल शाखा अंतर्गत पश्‍चिम उपविभागातमेन – शासकीय बंगल्यांच्या कामांमध्ये कोट्यावधींचा घोटाळा; सार्वजनिक बांधकाम विभागातील शासकीय निधीची लूट; अधिकार्‍यांची संगनमताने मिलीभगत : डॉ. अशोक सोनवणे

कर्जत: विनाअट सरसकट शेतकरी कर्जमाफीच्या मागणीवरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसत आहेत. सरकारने तातडीने यावर निर्णय न घेतल्यास येत्या २९ जून रोजी मराठवाड्यात तीव्र शेतकरी आंदोलन उभारण्याचा स्पष्ट इशारा आमदार रोहित पवार यांनी दिला आहे.

आश्वासनांची पूर्तता न झाल्याने नाराजी

पंढरपूर येथे शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी केलेल्या अन्नत्याग आंदोलनानंतर सरकारने दिलेल्या आश्वासनाची अद्याप पूर्तता झालेली नाही. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. या विषयावर विधानसभेत सविस्तर चर्चा घडवून आणण्याची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

आंदोलनादरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी आमदार पवार यांची भेट घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा घडवून आणली होती. त्यावेळी पावसाळी अधिवेशनापूर्वी या विषयावर विशेष बैठक आयोजित करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. या आश्वासनानंतरच आंदोलन स्थगित करण्यात आले होते. मात्र, अद्यापही संबंधित बैठक आयोजित करण्यात आलेली नसल्याने आमदार रोहित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

तातडीने सर्वपक्षीय बैठकीची मागणी

विधानसभा अध्यक्षांना दिलेल्या निवेदनात कर्जमाफी योजनेतील जाचक अटी हटविण्याबाबत सभागृहात व्यापक चर्चा घडवून आणण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच शासनाने दिलेल्या आश्वासनानुसार संबंधित विभागांचे मंत्री व वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय शिष्टमंडळाची तातडीने बैठक आयोजित करावी, असे निवेदनात म्हटले आहे.

या बैठकीसाठी विविध राजकीय पक्ष आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना सहभागी करून घेण्याची मागणीही करण्यात आली आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या या संवेदनशील प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभे राहील, असा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे.

COMMENTS