Homeताज्या बातम्या

श्री. राजाभाऊ लोमटे म्हणजे कामाप्रती प्रामाणिक आणि सहकार्य वृत्ती जोपासणारे व्यक्तिमत्त्व : मा. नवनाथराव थोटे

बीड: माऊली विद्यापीठ संचलित महिला कला महाविद्यालय, बीड येथे महाविद्यालयाचे ग्रंथपाल श्री. राजाभाऊ लक्ष्मणराव लोमटे यांचा सेवापूर्ती समारंभ सोमवार

“शिक्षण घेणे कधीही थांबवू नका, कारण जीवन कधीही शिकवणे थांबवत नाही” – अ‍ॅड. संजय रुईकर; होरायझन कॉलेजमध्ये प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे भव्य स्वागत
कर्तव्यदक्ष अतिरिक्त पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांचा मातृभूमी प्रतिष्ठानकडून गौरव
ग्रामीण महाराष्ट्राचा कायापालट! ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाचा दिमाखात शुभारंभ
Mauli Vidyapeeth's Mahila Kala Mahavidyalaya, Beed: Admission 2026, Cutoff,  Courses, Fees, Placements, Ranking

बीड: माऊली विद्यापीठ संचलित महिला कला महाविद्यालय, बीड येथे महाविद्यालयाचे ग्रंथपाल श्री. राजाभाऊ लक्ष्मणराव लोमटे यांचा सेवापूर्ती समारंभ सोमवार दि. २२ जून २०२६ रोजी अत्यंत उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माऊली विद्यापीठ, केजचे कोषाध्यक्ष मा. नवनाथराव थोटे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माऊली विद्यापीठाचे प्रशासकीय अधिकारी मा. प्रताप मोरे उपस्थित होते. व्यासपीठावर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या आयस्कर, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य श्री. श्रीरंग निंबाळकर, एम.आय.डी.सी. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. मधुकर काळे, सत्कारमूर्ती श्री. राजाभाऊ लोमटे व त्यांच्या पत्नी श्रीमती सुलभा लोमटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

शब्दांनी व गाण्यांनी झाली कार्यक्रमाची सुरुवात

कार्यक्रमाची सुरुवात ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताने झाली. यानंतर उपस्थित मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक करताना प्राचार्या डॉ. संध्या आयस्कर यांनी कार्यक्रम आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली आणि श्री. राजाभाऊ लोमटे यांच्या प्रदीर्घ सेवाकाळातील कार्याचा आढावा घेत त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी भूगोल विभागप्रमुख डॉ. वसुदेव जाधव, समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. सुनंदा आहेर आणि वरिष्ठ लिपिक श्री. अनिल राऊत यांनी आपल्या मनोगतातून लोमटे सरांच्या सहकार्यशील स्वभावाचे आणि कामातील तत्परतेचे कौतुक केले.

लोमटे सरांनी आपल्या कामातून माणसे जोडली

प्रमुख पाहुणे श्री. श्रीरंग निंबाळकर यांनी लोमटे सरांच्या कार्याचा गौरव करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच आपल्या भाषणात प्रसिद्ध कवी ना. धो. महानोर यांच्या ‘कसा संपला ६० वर्षांचा प्रवास’ या कवितेचा उल्लेख केला. प्रशासकीय अधिकारी मा. प्रताप मोरे यांनी सांगितले की, श्री. राजाभाऊ लोमटे यांनी आपल्या कामातून माणसे जोडली असून त्यांची काम करण्याची पद्धत वाखाणण्यासारखी आहे.

अध्यक्षीय समारोप करताना मा. नवनाथराव थोटे यांनी श्री. राजाभाऊ लोमटे यांच्या सेवाकाळातील विविध आठवणींना उजाळा दिला. लोमटे सर म्हणजे कामाप्रती प्रामाणिक, जबाबदार आणि सहकार्य वृत्ती जोपासणारे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी नोकरीच्या काळात अधिकारी, सहकारी आणि संस्थेशी अत्यंत चांगले संबंध निर्माण केले, असे प्रतिपादन त्यांनी आपल्या भाषणात केले.

महाविद्यालयाच्या परंपरेनुसार उपस्थित मान्यवरांना प्राचार्या डॉ. संध्या आयस्कर यांच्या हस्ते ग्रंथभेट देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वर्षा कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. सतीश बिडवे यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच माऊली प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. संतोष माने सर व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS