Homeताज्या बातम्या

विलास घुले मृत्यू प्रकरणाचा निष्पक्ष तपास करा; दोषींवर कठोर कारवाई करा – ना. पंकजाताई मुंडे

बीड: केज तालुक्यातील टाकळी-कदमवाडी परिसरात घडलेल्या विलास घुले या तरुणाच्या मृत्यूची घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगत राज्याच्या पर्यावरण व पश

“शिक्षण घेणे कधीही थांबवू नका, कारण जीवन कधीही शिकवणे थांबवत नाही” – अ‍ॅड. संजय रुईकर; होरायझन कॉलेजमध्ये प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे भव्य स्वागत
चांदणी चौकात वाहतूक नियमभंगाविरोधात पोलिसांची विशेष मोहीम; नियम तोडणाऱ्या वाहनचालकांकडून ९,७०० रुपयांचा दंड वसूल
अतिक्रमण हटाव मोहिमेला अडथळा करणार्‍यांवर गुन्हे दाखल करा; बीड शहर बचाव मंचाची मागणी
पंकजा मुंडेंना विधान परिषदेत संधी मिळणार? भाजपाकडून चाचपणी सुरू, ११ जणांची  नावे चर्चेत Mumbai Marathi News | bjp likely to nominate pankaja munde in  vidhan parishad election ...

बीड: केज तालुक्यातील टाकळी-कदमवाडी परिसरात घडलेल्या विलास घुले या तरुणाच्या मृत्यूची घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी या प्रकरणाचा कोणत्याही दबावाशिवाय सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांना दिल्या आहेत.

पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांना दूरध्वनीवरून सूचना

या घटनेच्या पार्श्वभूमीवर ना. पंकजाताई मुंडे यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याशी दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा करून घटनेची माहिती घेतली. यावेळी त्यांनी सांगितले की, माझ्या माहितीनुसार भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण होऊन त्याचा मृत्यू होणे ही अत्यंत वेदनादायक आणि दुर्दैवी बाब आहे. विलास घुले या तरुणाचा कोणताही संबंध नसताना त्याला आपला जीव गमवावा लागला, ही बाब अस्वस्थ करणारी आहे. पोलिसांनी या प्रकरणात कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता वस्तुनिष्ठ तपास करावा आणि दोषींवर योग्य ती कठोर कारवाई करावी, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.

मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे आश्वासन

मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी तपास यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहनही ना. पंकजाताई मुंडे यांनी केले आहे. मृत तरुणाच्या परिवाराने विश्वास ठेवून सहकार्य करावे, त्याच्या मृतदेहावर अंतिम संस्कार करणे हेच योग्य आहे, असे त्यांनी म्हटले. या प्रकरणात योग्य न्याय मिळण्यासाठी आम्ही पूर्णपणे कुटुंबाच्या पाठीशी असून, याबाबत मुख्यमंत्री महोदयांशीही सविस्तर चर्चा करणार असल्याचे ना. पंकजाताई मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.

COMMENTS