Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ओबीसी आरक्षण वगळून निवडणुका झाल्यास मतदानावर बहिष्कार : नंदकुमार कुंभार

इस्लामपूर / प्रतिनिधी : सन 1993 मंडल आयोग लागू झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ओबीसीचे प्रतिनिधी आरक्षणामुळे निवडून जाऊ लागले. कुठेतरी ओब

गृहपाठ न केल्यामुळे पडळकर-खोत तोंडघशी : राजू शेट्टी
कोयना भूकंपग्रस्तांच्या चौथ्या पिढीतील वारसांना भूकंपग्रस्तांचे दाखले वाटप
मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धेत पाचगणी पालिका प्रथम: स्वच्छता पुरस्कारात पांचगणी नगरपरिषदेची मांदियाळी

इस्लामपूर / प्रतिनिधी : सन 1993 मंडल आयोग लागू झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ओबीसीचे प्रतिनिधी आरक्षणामुळे निवडून जाऊ लागले. कुठेतरी ओबीसी मधील सभापती, नगराध्यक्ष, महापौर, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक होऊ लागले होते. परंतू गेल्या दहा वर्षात या देशातील आरक्षण संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परंतू आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण वगळून निवडणुका घेतल्यास मतदानावर बहिष्कार टाकला जावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य काँग्रेसचे सरचिटणीस नंदकुमार कुंभार यांनी केले आहे.
ते वाळवा पंचायत समितीच्या खादी ग्रामोद्योग संस्थेत ओबीसी समाजाच्या बैठकीत बोलत होते.
नंदकुमार कुंभार म्हणाले, काही प्रस्थापित पक्ष व संघटनांनी जाणून-बुजून ओबीसीचे आरक्षण संपावे या पद्धतीने पावले टाकायला सुरुवात केली होती. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर त्यांचा तो डाव यशस्वी झाला. ओबीसींचे राजकीय आरक्षण स्थगित झाले. त्यामुळे ओबीसी समाजाचे मोठे राजकीय नुकसान झाले आहे. परिस्थिती अशीच राहिली तर येणार्‍या काळात ओबीसींचे शैक्षणिक व राजकीय आरक्षण देखील संपविल्या शिवाय राहणार नाहीत. त्यामुळे जर आपल्याला राजकीय आरक्षण मिळणार नसेल तर आरक्षणाविना होणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणुकांवर ओबीसी बहुजन समाजाने बहिष्कार टाकला पाहिजे. त्यासाठी आम्ही जनजागरण चालू करत आहोत.
बैठकीस काँग्रेस ओबीसी सेल पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. विवेक गुरव, गजानन गायकवाड, अजित भांबुरे, दत्तात्रय गायकवाड, सुरज चांदणे, राजू कोळी, रघुनाथ पिसे उपस्थित होते.

COMMENTS