Homeताज्या बातम्या

नागपूरच्या नव्या पोलीस आयुक्तपदी विश्वास नांगरे-पाटील

नागपूर : मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांचा जिल्हा असलेल्या शहरात पोलीस प्रशासनात महत्त्वाचा बदल करत राज्य गृह मंत्रालयाने

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार; कारेगव्हाण जिल्हा परिषद शाळेतील प्रवेशोत्सवात सीईओ जितिन रहमान यांचे प्रतिपादन
भगवान शंकरांची उपासना जीवनात वैभव आणते; निंदा आणि अहंकार विनाशाला कारणीभूत – कथाकार शिवम शुक्ल
गोदावरी ‘शुद्ध’ की चाटूगिरीचा महापूर? प्रसिद्धी पत्रकावरून बातमीदारी करणार्‍यांच्या अकलेची नांदेडकरांना कीव!
विश्वास नांगरे पाटील नागपूरचे नवे पोलीस आयुक्त, मुख्यमंत्र्यांच्या गृहशहरात  कायदा-सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान

नागपूर : मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांचा जिल्हा असलेल्या शहरात पोलीस प्रशासनात महत्त्वाचा बदल करत राज्य गृह मंत्रालयाने मंगळवारी वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. त्यानुसार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक विश्वास नांगरे-पाटील यांची नागपूरच्या नव्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

गेल्या अडीच वर्षांहून अधिक काळ नागपूरचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत असलेले रवींद्र कुमार सिंगल यांची बदली करण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती नांगरे-पाटील यांच्या जागी लाचलुचपत विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालक पदावर करण्यात आली आहे. कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतरही सिंगल नागपुरात कार्यरत होते. अखेर गृह मंत्रालयाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय घेत त्यांच्या जागी नांगरे-पाटील यांच्यावर नागपूर शहराची धुरा सोपवली.

राज्यातील अप्पर पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांसह राज्य पोलीस सेवेतील उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांचेही रेंगाळलेले बदली आदेश मंगळवारी जारी करण्यात आले. अमरावती येथील पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ यांची नागपूर येथे बदली करण्यात आली असून त्यामुळे शहर पोलीस दलाला आणखी एक उपायुक्त मिळणार आहे.

दरम्यान, नागपूर विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांची बदली छत्रपती संभाजीनगर येथे पोलीस उपायुक्त म्हणून करण्यात आली आहे. राज्यपालांच्या आदेशानुसार गृहविभागाचे सहसचिव सुग्रीव धपाटे यांनी या बदल्यांचे आदेश जारी केले. विश्वास नांगरे-पाटील यांच्या नियुक्तीमुळे नागपूर पोलीस दलाच्या नेतृत्वात नवे पर्व सुरू होणार असून कायदा व सुव्यवस्था, गुन्हेगारी नियंत्रण आणि वाहतूक व्यवस्थापनाच्या दृष्टीने त्यांच्या कामगिरीकडे लक्ष लागले आहे.

COMMENTS