Homeताज्या बातम्याराजकारण

बहुजन वंचित आघाडी म्हणजे वंचितांच्या राजकीय परिवर्तनाची चळवळ- अ‍ॅड. सिद्धार्थ कदम

वंचित बहुजन आघाडीच्या भोकर तालुका कार्यकर्ता जनसंवाद मेळाव्यात संघटनबांधणी, बूथरचना आणि आगामी निवडणुकांच्या तयारीवर सखोल चर्चा करण्यात आली. प्रदे

पवनराजे निंबाळकर हत्येचा निकाल लांबणीवरमाजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह 10 जणांवर आरोप
शिवसेना (शिंदे गट) अल्पसंख्यांक विभाग बीड जिल्हाप्रमुखपदी ए. एस. गोलू यांची नियुक्ती
तरुण, तडफदार व जिद्दी नेतृत्व असलेले अमर शेख यांची बीड जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदी निवड करावी – शाहेबाज कादरी यांची मागणी
वंचित बहुजन आघाडी - विकिपीडिया



वंचित बहुजन आघाडीच्या भोकर तालुका कार्यकर्ता जनसंवाद मेळाव्यात संघटनबांधणी, बूथरचना आणि आगामी निवडणुकांच्या तयारीवर सखोल चर्चा करण्यात आली. प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड. गोविंद दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यात कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.
दीपप्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गावपातळीवरील संघटन मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. यावेळी स्वागताध्यक्ष अ‍ॅड. सिद्धार्थ कदम म्हणाले, बहुजन वंचित आघाडी म्हणजे केवळ राजकारण नसून वंचितांच्या राजकीय परिवर्तनाची चळवळ आहे. समाजातील शेवटच्या घटकाला न्याय, हक्क आणि सत्तेत प्रतिनिधित्व मिळवून देण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने गावागावात जाऊन जनजागृती करावी. प्रदेश उपाध्यक्ष ड. गोविंद दळवी यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत संविधानिक विचार गावागावात पोहोचविण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंजि. प्रा. राज अटकोरे होते. स्थायी समिती सदस्या सुनिता जोंधळे, नगरसेवक दिलीप देशमुख, राहुल सोनसळे, प्रशांत इंगोले, कुलदीप राक्षसमारे, दीपक मगर, डॉ. संघरत्न कुर्हे, प्रकाश कोल्हे आदी मान्यवर उपस्थित होते. नांदेड जिल्ह्यातील नवनियुक्त नगरसेवकांचा नागरिकांच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन सुभाष तेले यांनी तर आभार प्रसाद शहाणे यांनी मानले.

COMMENTS