Homeताज्या बातम्या

आचारसंहिता संपल्याने राज्य सरकारचा अधिकार्‍यांच्या बदल्यांचा धडाका; तुकाराम मुंढे यांच्या जागेवर डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची नेमणूक

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अन्न व औषध प्रशासन आयुक्त म्हणून काम करताना राज्यभरात भेसळीविरोधात कठोर मोहीम राबवून अनेकांना धडकी भरवणारे तुकारा

तुकाराम मुंडेंचा धडाका! एफडीएच्या धाडसत्राने नांदेडमधील भेसळखोरांचे धाबे दणाणले; निकृष्ट मालाची गुपचूप विल्हेवाट सुरू
देगलूर-बिलोलीत उभारणार अत्याधुनिक ‘कृषी भवन’; शेतकऱ्यांसाठी आमदार जितेश अंतापूरकर यांचे मोठे पाऊल
बीडच्या जिरेवाडीत अज्ञातांकडून कथित जादूटोण्याचा प्रकार; वारंवार संशयास्पद साहित्य आढळल्याने कुटुंबात भीतीचे वातावरण

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अन्न व औषध प्रशासन आयुक्त म्हणून काम करताना राज्यभरात भेसळीविरोधात कठोर मोहीम राबवून अनेकांना धडकी भरवणारे तुकाराम मुंढे यांची राज्य सरकारने महत्त्वाच्या पदावरून उचलबांगडी केली आहे. मुंढे यांना महत्त्वाच्या पदावरून हटवण्यात आले असून त्यांच्या जागी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच तुकाराम मुंढे यांची अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून नियुक्ती केली होती. सुरुवातीस आयुक्तपद हे कमी दर्जाचे असून सरकारने आपला अवमान केल्याचे सांगत या पदावर रुजू होण्यास मुंढे नाखूष होते. मात्र, राज्य सरकारने त्यांची अन्य पदावर नियुक्तीची विनंती फेटाळल्यानंतर मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारताच धडक कारवाई सुरू केली होती. मुंढे यांनी गेल्या पंधरा-वीस दिवसांत भेसळीविरोधात धडक मोहीम राबविली. कारवाईदरम्यान अन्न, औषधे, दूध, खवा भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा बडगा उगारत अनेकांना जेलमध्ये पाठविले आहे. एवढेच नव्हे तर काही मोठ्या कंपन्या, उद्योग, हॉटेलवरही मुंढे यांनी कारवाई करत आपल्या कामाची चुणूक दाखविली होती.

तुकाराम मुंढे यांच्यावर मनमानी कारभाराचा आरोप करत त्यांची बदली करण्यासाठी काही नाराज मंडळी प्रयत्नशील असताना राज्य सरकारने मंगळवारी मुंढे यांना आणखी एक धक्का दिला. राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यात प्रशासकीय सोयीसाठी पालक सचिवांची नियुक्ती केली आहे. जिल्ह्यात राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून पालकमंत्र्यांच्या साहाय्यासाठी तसेच जिल्ह्यातील प्रश्नांची शासन दरबारी सोडवणूक करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एका सचिवाची पालक सचिव म्हणून नियुक्ती करण्यात येते. या प्रथेनुसारच सरकारने तुकाराम मुंढे दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव असताना त्यांची परभणीचे पालक सचिव म्हणून नियुक्ती केली होती. मात्र, मुंढे यांची दिव्यांग कल्याण विभागातून बदली करण्यात आल्यानंतर मुंढे यांची आता परभणीच्या पालक सचिव पदावरूनही उचलबांगडी करण्यात आली आहे.

आता मुंढे यांच्या जागी परभणीचे नवीन पालक सचिव म्हणून ग्रामविकास विभागाचे सचिव चंद्रकांत पुलकुंडवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर जिल्हा पालक सचिवपदी कृषी सचिव परिमल सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

COMMENTS