Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अर्थसंकल्पात मुंबई करांची थट्टाच

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कोणत्याही मोठया घोषणाच नाही

मुंबई/प्रतिनिधी ः मुंबई महापालिकेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असतांना, मोदी सरकार केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये मुंबईकरांवर घोषणांचा वर्षावर क

ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजनेच्या आर्थिक निकषात वाढ
‘अवतार २’ पाहताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन
 ओबीसी महिला सरपंच व सरपंच प्रतिनिधी यांना ग्रामपंचायत सदस्या कडून मारहाण 

मुंबई/प्रतिनिधी ः मुंबई महापालिकेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असतांना, मोदी सरकार केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये मुंबईकरांवर घोषणांचा वर्षावर करेल, असे संकेत होते. मात्र प्रत्यक्षात अर्थसंकल्पात मुंबईकरांची एकप्रकारची थट्टाच केल्याचे दिसून आले. मुंबईसाठी कोणत्याही विशेष तरतुदी, प्रकल्प किंवा योजना नसल्याने मुंबईकरांच्या पदरी मात्र निराशा पडली. मुंबईतून करांचा मोठा वाटा केंद्र सरकारला मिळत असताना या शहरासाठी केंद्र सरकारने अधिक निधी द्यावा, अशी अनेक वर्षांपासून मागणी होत आहे. महापालिकेची निवडणूक काही महिन्यांत अपेक्षित असताना मुंबईसाठी विशेष तरतुदींची अपेक्षा होती.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील जनसुविधा प्रकल्पांचे नुकतेच भूमिपूजन केले आणि मेट्रोच्या दोन टप्प्यांचे लोकार्पणही केले. आणखी काही कार्यक्रमांसाठी पंतप्रधान मोदी मुंबईत येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर मुंबई किंवा एमएमआरडीए परिसरासाठी काही विशेष तरतुदी किंवा योजनेची घोषणा अर्थसंकल्पात अपेक्षित होती. मात्र अर्थसंकल्पात त्यादृष्टीने कोणताही उल्लेख नाही. मेट्रो, रेल्वे प्रकल्प, विस्तारीकरण योजना, केंद्र सरकारच्या काही योजना यातून मुंबई व राज्याला केंद्र सरकारकडून निधी मिळतो. मात्र अर्थसंकल्पात मुंबईसाठी कोणत्याही विशेष प्रकल्पाचा उल्लेख नाही. मोठया शहरांच्या परिसरात राहणार्‍या नोकरदारांना घर ते कामाच्या ठिकाणापर्यंत आरामदायी प्रवास करता यावा यासाठी वंदे मेट्रो रेल्वे विकसित करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्‍वीनी वैष्णव यांनी बुधवारी दिली. ही रेल्वे वंदे भारत या रेल्वेगाडीचे लघु रूप असेल, असेही त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वकांक्षी प्रकल्पांपैकी देशातील पहिला मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प 2023 मध्ये पूर्णत्वास येणार होता. मात्र, हा प्रकल्प तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात रखडला, असे रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

COMMENTS