Homeताज्या बातम्या

मतमोजणी केंद्र परिसरात 200 मीटरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

नांदेड जिल्ह्यातील विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक-2026 च्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकारी राहुल कर

केज-अंबाजोगाई रोडवरील लूटमार प्रकरणाचा अवघ्या काही तासांत छडा; दोन दरोडेखोर जेरबंद
बीडमध्ये कादरी फाउंडेशन आक्रमकनाजिया इलाही खान यांच्यावर कारवाईची मागणी, अन्यथा हजारोंचा मोर्चा व उपोषणाचा इशारा
तोहीद खान हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावीकामरान खान शिवसेना अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख बीड
पुणे : मतमोजणी केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश



नांदेड जिल्ह्यातील विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक-2026 च्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) 2023 च्या कलम 163 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
सोमवार, 22 जून 2026 रोजी होणार्‍या मतमोजणीदरम्यान मतमोजणी केंद्राच्या 200 मीटर परिसरात मोबाईल फोन, कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपक तसेच इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच मतमोजणी प्रक्रियेशी संबंधित नसलेल्या व्यक्तींना या परिसरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. मतमोजणीची प्रक्रिया सुरळीत, शांततेत आणि पारदर्शकपणे पार पडावी तसेच कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी हा आदेश लागू करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, मतमोजणी सुरू झाल्यापासून संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हा आदेश प्रभावी राहणार आहे.

COMMENTS