Homeताज्या बातम्या

धीरज बोर्डेचे ‘सिडको’ च्या परीक्षेत यश  

श्रीरामपूर :तालुक्यातील मातुलठाण येथील धीरज संपतराव बोर्डे यांनी नगर नियोजन व पायाभूत सुविधा क्षेत्रातील अग्रगण्य संस्था 'सिडको' तर्फे घेण्यात आल

पोलिस पाटील संघटनेच्या बीड जिल्हाध्यक्षपदी कृष्णा कदम यांची निवडसर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव
जि.प.के. प्रा. शाळा वांगीच्या मुख्याध्यापकांची कन्या साक्षी वीर एमबीबीएस पदवीधर; परिश्रम आणि जिद्दीची प्रेरणादायी कहाणी
प्रज्ञाशोध परीक्षेत समर व सक्षम यशस्वी


श्रीरामपूर :तालुक्यातील मातुलठाण येथील धीरज संपतराव बोर्डे यांनी नगर नियोजन व पायाभूत सुविधा क्षेत्रातील अग्रगण्य संस्था ‘सिडको’ तर्फे घेण्यात आलेल्या सहाय्यक अभियंता (स्थापत्य) या संवर्गातील परीक्षेत राज्यात १४ वे स्थान मिळवून घवघवीत यश मिळविले. सिडकोच्या निवड परीक्षेत यश संपादन करणारे धीरज बोर्डे हे तालुक्यातील पहिलेच मानकरी ठरले आहेत.
  धीरज संपतराव बोर्डे यांनी यापूर्वी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतही घवघवीत यश संपादन केले होते. सध्या ते धुळे येथे जलसंपदा विभागात सहाय्यक अभियंता पदावर कार्यरत आहेत.आता त्यांनी सिडकोच्या परीक्षेतही घवघवीत यश मिळविले असून त्यांची सहाय्यक अभियंता (स्थापत्य)या पदावर नियुक्ती होणार आहे. यशाबद्दल बाळासाहेब खंडागळे, सुधाकर खंडागळे, भास्कर खंडागळे,एन. जी. खंडागळे,एन. जी. खंडागळे,नानासाहेब जोंधळे,अमोल देशमुख,अमोल बोर्डे,देवेंद्र बोर्डे आदींनी  अभिनंदन केले आहे.

COMMENTS